समाजात प्रत्येक स्त्री ही स्वतःच स्थान निर्माण करण्यासाठी अनेक धडपड करत असते. स्त्री ही काम, कुटुंब अश्या अनेक जबाबदारी पार पडताना दिसते. असाच एका स्त्रीची लोकप्रिय मालिका म्हणजे आई कुठे काय करते. आई कुठे काय करते ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते. ही मालिका सध्या तिच्या कथानकामुळे चर्चेत आहे.या मालिकेचे संपूर्ण कथानक अरुंधती म्हणजे आई भोवती फिरताना दिसत. अरुंधती ही भूमिका मालिकेत अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर साकारताना दिसते. मधुराणी ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ती मालिकेच्या अपडेट प्रमाणेच सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ देखील शेअर करत असते.नुकतंच तिने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत, स्त्रियांना खास सल्ला दिलाय.(Madhurani Prabhulkar)

अरुंधती मालिकेत देखील कुटुंबात स्त्रीचं महत्त्व अधोरेखित करत आहे. असाच तिने सोशल मीडियावर एक स्त्रियांनां सल्ला देत एक व्हिडीओ शेअर केलाय.ज्यामध्ये सुंदर साडी नेसून, गॉगल लावून अरुंधती गाडी चालवत आहे. सोबत छान गाणं ऐकत ती गाडी चालवण्याची मजा घेत आहे.या व्हिडिओला तिने एक भन्नाट कॅप्शन दिलं आहे. ”Arundhati…. On the go.. प्रत्येक स्त्रीनं वेळीच आपल्या आयुष्याचं स्टेअरिंग व्हील आपल्या हातात घ्यायला हवं. हे असं…..!” अशी पोस्ट तिनं केली आहे. तर तिची ही पोस्ट पाहून चाहत्यांनी छान हो, आणि कॅप्शन तर छान आहे साजेस,आरू u are the best अश्या अनेक कमेंटचा वर्षाव करत चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे.(Madhurani Prabhulkar)
हे देखील वाचा: अभिनेता हृषीकेश शेलारच्या मुलीचा नामकरण सोहळा संपन्न, हृषीकेश ने शेअर केलेले सुंदर फोटोज पाहा
अरुंधती ही सोशल मीडियावर नेहमी वेगवेगळ्या विषयांवर स्वतःच मत मांडत असते. या पोस्टमध्ये मधुराणीने स्त्रियांना या समाजात आजही सामोरं जावं लागणाऱ्या गोष्टीबद्दल भाष्य करत तिने त्यांना सल्ला दिलाय. या आधी देखील ती अनेक पोस्ट करत महिलांना अनेक प्रकारचा सल्ला देत असते.तसेच अरुंधती ही तिच्या लेकीसोबत अनेक धम्माल मस्तीचे व्हिडीओ शेअर करते. एकीकडे अरुंधतीची ऑफ स्क्रिन धमाल करते, तर व ऑनस्क्रीन ती दुसर लग्न होऊनही आपलय मुलांची जबाबदारी साकारताना दिसतेय. तर आता ती मुलांची जबाबदारी कशी पार पडेल हे मालिकेत पाहणं सध्या उत्सुकतेचं ठरेल.
