मंगळवार, जून 3, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बहीण किडनॅप झाल्यानंतर श्वेताला बेशुद्ध करुन लीलाच ऐजेबरोबर लग्नाला उभी राहणार, सूनांनाही बसला धक्का, कथेमध्ये मोठा ट्वीस्ट

Saurabh Moreby Saurabh More
मे 31, 2024 | 7:24 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Navri Mile Hitlerla serial new promo out Leela and AJ getting married in this video.

बहीण किडनॅप झाल्यानंतर श्वेताला बेशुद्ध करुन लीलाच ऐजेबरोबर लग्नाला उभी राहणार, सूनांनाही बसला धक्का, कथेमध्ये मोठा ट्वीस्ट

झी मराठी वाहिनीवरील सध्या सर्वच मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहेत. यापैकी ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका सध्या प्रेक्षकांचे चांगलेच लक्ष वेधून घेत आहे. या मालिकेचे कथानक थोडे हटके असून दिवसेंदिवस या मालिकेची लोकप्रियता खूप वाढत आहे. मालिकेत सध्या अभिराम व श्वेता यांच्या लग्नाचे कथानक सुरु आहे. अशातच आता अभिराम व श्वेताऐवजी अभिराम व लीला यांचे लग्न होणार असल्याच्या ट्विस्टचा एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

या नवीन प्रोमोमध्ये एजे त्यांच्या पहिल्या पत्नीच्या फोटोला पाहून “तुमच्या शेवटच्या इच्छेप्रमाणे मी पुन्हा एकदा लग्न करत आहे” असं म्हणतो. यानंतर एजेंच्या बाकी तीन सुना श्वेताला लग्नासाठी आवाज देत आहेत. मात्र लीला कोणत्या तरी अनोळख्या व्यक्तीचा फोन येतो आणि त्यांनी लीलाच्या बहिणीला किडनॅप केले असते. त्यामुळे तिच्या जीवाची धमकी देत ते लीलाला एजेंबरोबर लग्न करण्याविषयी सांगतात. त्याचबरोबर ते एजेंच्या होणाऱ्या बायकोला म्हणजेच श्वेताला गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करायला सांगतात.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – समीर चौघुले सुरु करणार स्वत:चा कार्यक्रम, पोस्ट करत मोठी घोषणा, शोचं नाव आहे…

याप्रमाणे लीला श्वेताच्या मागून येऊन तिला बेशुद्ध करते आणि श्वेताची साडी स्वत: परिधान करून एजेंबरोबर ती लग्नाला उभी राहत असल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. या प्रोमोमध्ये लीला  व एजे एकमेकांबरोबर सप्तपदी घेतानाचेही पाहायला मिळत आहे. दरम्यान, संपूर्ण लग्नात लीलाच्या डोक्यावर पदर असल्यामुळे एजेंचं लग्न नक्की श्वेताशी होत आहे की लीलाशी? हे कुणालाच कळत नाही. पण एजेची आई लीलाच्या डोक्यावरुन पदर काढताच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसतो.  

आणखी वाचा – दुसऱ्यांदा संसार थाटल्यानंतर वर्षभरातच नवऱ्यापासून वेगळी, गंभीर आरोपांनंतर पुन्हा नव्या नवरीसारखी नटली सुप्रसिद्ध अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, गेले काही दिवस लीला व एजेंच्या यांच्या लग्नावईषयी सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती. अशातच आता या नवीन प्रोमोमुळे सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे मालिकेच्या आगामी भागात काय पाहायला मिळणार?, एजे व लीला यांचे लग्न खरंच होणार की? यात आणखी काय नवीन तवसीत येणार? याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.  

Tags: marathi entertainment newsMarathi Serial NewsNavri Mile Hitlerla
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

seema kapoor torchered by own mother
Entertainment

आईकडून मारहाण, टॉर्चर अन् हाल; सुप्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला वाईट काळ, जन्मदातीच वैरी ठरली तेव्हा…

जून 2, 2025 | 7:00 pm
Premachi Goshta fame Swarda Thigales car accident
Entertainment

‘प्रेमाची गोष्ट’मधील मुक्ताचा अपघात, गाडी चालवताना झोप लागली अन्…; अभिनेत्रीचं मोठं नुकसान

जून 2, 2025 | 5:58 pm
Vaishnavi Hagawane Death
Entertainment

वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं बाळ कोणाजवळच राहीना, आईविना लेकराचे रडून-रडून हाल, हृदयस्पर्शी व्हिडीओ समोर

जून 2, 2025 | 5:00 pm
Radhika Apte Motherhood
Entertainment

बाळ होण्याच्या एक दिवस आधीपर्यंत केलं काम, अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतील सत्य, म्हणाली, “इथं काम करणं…”

जून 2, 2025 | 3:30 pm
Next Post
01 June 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

कर्क व कन्यासह ‘या’ राशींवर १ जून रोजी शनिदेवाची कृपा होणार, जाणून घ्या, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असणार?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.