भारतातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा शाही विवाह सोहळा जुलै महिन्यात पार पाडणार आहे. याआधीच फेब्रुवारी महिन्यात अनंत व राधिका यांचा प्री-वेडिंग सोहळा पार पडला. हा सोहळा गुजरातमधील जामनगर येथे थाटामाटात पार पडला. या सोहळ्यासाठी अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. या सोहळ्यासाठी तब्बल १६०० कोटी रुपयांचा खर्च झाल्याचेही समोर आले. पहिला प्री-वेडिंग सोहळ्याची चर्चा संपतेच आहे तोपर्यंत अंबानी कुटुंबाने दुसऱ्यांदा प्री-वेडिंग सोहळा आयोजित केला आहे. त्याबाबत आता सर्व अपडेट समोर येत आहेत. (anant ambani and radhika merchant pre-wedding)
अनंत व राधिकाच्या प्री-वेडिंगला आजपासून सुरुवात झाली आहे. २९ मे ते १ जूनदरम्यान हा सोहळा पार पडणार आहे. हा प्री-वेडिंग सोहळा अलिशान क्रूझवर पार पडणार आहे. या क्रूझवर जगभरातील सर्व सुख-सुविधा उपलब्ध आहेत. हा क्रूझचा प्रवास इटलीमध्ये सुरु होणार असून फ्रांस येथे संपणार आहे. हा प्रवास ४३८० किलोमीटरचा असणार आहे. या प्रवासादरम्यान पार्टी, जेवण, मजा-मस्ती अशा अनेक कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे.

दरम्यान आता सोहळ्याला सुरुवात झाली असून ऑरीने काही फोटो शेअर केले आहेत. ऑरीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन क्रूझवरील काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पोएटो इटली, सार्डिनिया येथील आहेत. त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केलेल्या फोटोमध्ये क्रूझवरील त्याच्या खोलीमधून समुद्र दिसत आहे. तसेच बीचवरीलही सुंदर असे नजारे पाहायला मिळत आहेत. हे फोटो शेअर करत त्याने “परफेक्ट मॉर्निंग” असे कॅप्शन दिले आहे.
याव्यतिरिक्त सोशल मीडियावर क्रूझचा एक व्हिडीओदेखील व्हायरल होत आहे. यामध्ये क्रूझवरुन फटाके फोडल्याचे दिसत आहे. हे सर्व खूप अविस्मरणीय दिसत आहे. या पार्टीमध्ये बॉलीवूडमधील सलमान खान, रणबीर कपूर, आलिया भट्ट, रणवीर सिंह असे अनेक कलाकार उपस्थित आहेत. या पार्टीमध्ये खूप धमाल मस्ती होणार आहे. आधीच्या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी हॉलीवूड पॉपस्टार रिहाना उपस्थित होती. यावेळी शकिरा उपस्थित राहणार असल्याचे वृत्त समोर येत आहे.
या पार्टीमध्ये नक्की कोणते कार्यक्रम होणार आहेत? हे जाणून घेऊया. मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या दिवशी वेलकम लंच व स्टारी नाइट पार्टी होणार आहे. यानंतर दुसऱ्या दिवशी रोम शहर फिरण्याचा प्लान आहे. त्यानंतर क्रुझवरच जेवणाचा बेत आहे तसेच टोगा पार्टीदेखील होणार आहे. तसेच चौथ्या दिवशी म्हणजे एक जून रोजी इटलीच्या पॉर्टोफिनो शहर फिरता येणार आहे.
‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार, आमंत्रण पत्रिकेचे शीर्षक “La vitae e un viagio” असे आहे. त्यानुसार 29 मे रोजी क्रूझ जहाजावर स्वागत लंचने या सेलिब्रेशनची सुरुवात होणार आहे. यानंतर, त्याच संध्याकाळी “स्टारी नाईट” आयोजित केले जाईल. दुसऱ्या दिवशी “अ रोमन हॉलिडे” या थीमसह पर्यटकांच्या आकर्षक ड्रेस कोडसह पुढे नेले जातील. 30 मे रोजी रात्रीची थीम “ला डोल्से फार निएंते” आहे आणि त्यानंतर सकाळी 1 वाजता “टोगा पार्टी”चे आयोजन करण्यात आले आहे.दुसऱ्या दिवशी थीम आहेत “वुई टर्न वन अंडर द सन,” “ले मास्करेड,” आणि “पर्डन माय फ्रेंच.” तसेच शनिवारी, थीम “ला डोल्से व्हिटा” असेल ज्यामध्ये इटालियन ड्रेसकोड असणार आहे.