बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान आणि जुही चावला यांच्या कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) IPL २०२४ची ट्रॉफी जिंकली. चेन्नई येथे झालेल्या मेगा मॅचमध्ये केकेआरने सनरायझर्स हैदराबादचा पराभव करत विजेतेपदावर नाव कोरलं. केकेआरचा विजय केवळ संघानेच साजरा केला नाही तर शाहरुख आणि त्याच्या कुटुंबानेही आनंदाने उड्या मारत हा आनंद साजरा केला. केकेआरच्या विजयानंतर शाहरुखने त्याची सिग्नेचर स्टाइल पोजही दिली. मैदानावर पोहोचून उपस्थितांचेही त्याने स्वागत केले. एवढेच नाही तर संघाच्या विजयाचे सेलिब्रेशन करताना शाहरुखने पत्नी गौरी खानच्या कपाळाला किसही केले. (Shahrukh Khan Enjoying Victory Of KKR)
कोलकाता नाईट रायडर्सच्या विजयावर शाहरुख खान खूपच खूश असलेला दिसला. शाहरुख खानचे स्टेडियमवरील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये तो आनंदाने नाचताना, पत्नीच्या कपाळावर किस करताना आणि त्याच्या सिग्नेचर स्टाइलमध्ये पोज देताना दिसत आहे. अखेर केकेआरने अनेक वर्षांनी आयपीएल ट्रॉफी जिंकली यामुळे शाहरुखचा आनंद गगनात मावेनासा झाला.
शाहरुख खान काही दिवसांपूर्वीच रुग्णालयात ऍडमिट झाला होता. त्याला उष्माघात आणि डिहायड्रेशनचा त्रास झाला होता. रुग्णालयातून बरे झाल्यानंतर, तो थेट चेन्नईला पोहोचला. जिथे त्याने कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील आयपीएल २०२४च्या फायनलमध्ये भाग घेतला. यावेळी शाहरुख त्याची लेक सुहाना खान, मुले आर्यन व अबराम आणि पत्नी गौरी खानबरोबर स्टँडवर दिसला.
शाहरुख खान व त्याच्या कुटुंबाव्यतिरिक्त, सुहानाचे चांगले मित्र अनन्या पांडे, शनाया कपूरदेखील KKR स्टँडमध्ये दिसले. त्याचवेळी शाहरुखची या सामन्यातील उपस्थिती व वागणूक पाहता तो पूर्णपणे बरा असल्याचं दिसलं. सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना १८.३ षटकात ११३ धावा केल्या. संपूर्ण संघ बाहेर पडला होता. तर मैदानात उतरलेल्या कोलकाता नाईट रायडरने अवघ्या १०.३ षटकांत हे लक्ष्य पूर्ण केले. यावेळी संघाचे दोनच खेळाडू बाद झाले. KKR ने IPL 2024 चा अंतिम सामना ८ गडी राखून जिंकला.