झी मराठी वाहिनीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. गेले काही दिवस ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे. मालिकेने सात वर्षांचा लीप घेतला असून यालीप नंतर मालिकेत अनेक उत्कंठावर्धक वळणं येत आहेत. मालिकेत अप्पी व अर्जुन यांच्या मुलाची म्हणजेच अमोलची एंट्री झाली आहे आणि त्याची भूमिका सर्वांच्याच पसंतीस पडत आहे. तसेच मालिकेतील अप्पी व अर्जुनबरोबरची त्याची केमिस्ट्री सर्वांनाच आवडत आहे.
सात वर्षांपूर्वी अप्पी व अर्जुन यांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. अशातच आता या दोघांच्या आयुष्यात तिसरी व्यक्ती येऊ पाहत आहे. अर्जुनबरोबर असणारी त्याची मैत्रीण आर्या ही अर्जुनच्या प्रेमात पडली असून तिने अर्जुनविषयीच्या तिच्या भावना अर्जुनच्या बाबा व वहिनीकडे व्यक्त केल्या आहेत. मालिकेतील आर्या व अमोल यांची मित्री दाखवण्यात आली असून त्यांच्यातील मैत्रीचे नाते नवरा-बायकोच्या नात्यामध्ये बदलावे म्हणून अर्जुनची वहिनी प्रयत्न करत आहे. याचा एक प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे.
झी मराठी वहिनीद्वारे या मालिकेसंबंधित एक प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये आर्या व अर्जुन यांचा साखरपुडा होतानाचे पाहायला मिळत आहे. यात आर्या अर्जुनला तुला तुझा भूतकाळ मागे टाकून आपल्या नवीन नात्याची सुरवात करावी लागेल“ असं म्हणते. यानंतर त्यांच्या साखरपुड्यात अमोल येतो आणि तो तुम्हीच माझे बाबा आहेत हे कळलं आहे मला असं म्हणताना दिसत आहे.
यापुढे तो “मी हे लग्न होऊच देणार नाही” असंही म्हणत अप्पीमा आणि तुम्हाला एकत्र आणणार” असा निर्धारही करतो. त्यामुळे आता अमोलला अर्जुन त्याचा बाबा असल्याचं खरचं माहीत झालं आहे का? अमोल त्याच्या आई-वडिलांना म्हणजेच अप्पी व अर्जुन यांना एकत्र आणणार का? हे आगामी भागांत पाहायला मिळेल. त्यामुळे ‘अप्पी आमची कलेक्टर’च्या पुढील भागासाठी प्रेक्षक कमालीचे उत्सुक आहेत हे नक्की.