प्रत्येक कलाकाराची ख्याती त्याच्या स्वभाव आणि व्यक्तिरेखा यावर अवलंबुन असते. त्यांच्या मूळच्या स्वभावाद्वारे पुढच्या पिढीला त्यांची ओळख करून दिली जाते. या मायानगरीत अनेक कलाकार आले आणि गेले परंतु लक्षात तेच राहिले ज्यांनी या चित्रपट सृष्टीला त्यांच्या कलेच्या माध्यमातून पुरेसे योगदान दिले. (Actor Rajkumar Jail Controversy)
राज कुमार हे हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये तरंगी माणूस म्हणून ओळखले जायचे. ज्यांनी कोणी राज कुमार यांच्या सोबत काम केले होते, ते सांगतात राजकुमार हे एक विक्षिप्त प्रकारची व्यक्ती होती.

परंतु काही जण म्हणतात राजकुमार यांचे त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीवरून परीक्षण केले तर ते तुम्हाला तसेच दिसतील, पण त्यांच्यासोबत ज्यांनी जास्त वेळ घालवला आहे त्यांना ती व्यक्ती प्रेमळ स्वभावाचीच वाटली आहे. त्यांचा असा स्वभाव होण्यामागे त्यांच्या आयुष्यात तशी एक घटना घडली होती. (Actor Rajkumar Jail Controversy)
१९५५ साली राजकुमार यांचे करियर उंच भरारी घेत असताना, त्यांच्या आयुष्यात असा एक प्रसंग घडला की त्यांचं संपूर्ण आयुष्याचं या घटनेने बदलून टाकलं. त्या वेळेस “मदर इंडिया” या चित्रपटासाठी स्क्रीन टेस्टिंग
पास केल्यानंतर त्यांची मदार इंडिया या चित्रपटासाठी निवड करण्यात आली होती.
मदार इंडिया चित्रपट चांगलाच यशस्वी झाला. परंतु या चित्रपटाच्या यशाचा आनंद राजकुमार यांना इतका आनंद घेता आला नाही.तेव्हाच त्यांच्या आयुष्यात एक विचित्र घटना घडली आणि त्यांच्या आयुष्यात वादळ निर्माण झालं.

राजकुमार यांचा स्वभाव बदलणारी ती घटना…
राजकुमार आणि त्यांचे २ मित्र एका मित्राची डॉक्टर असलेली पत्नी हे सगळेजण चित्रपटाचा ९ वाजताचा एक शो बघायला गेले होते सिनेमावरून परत येताना राजकुमार हे त्यांचा मित्र आणि त्याच्या पत्नीला आपल्या जीपने घरी सोडायला गेले असता, मित्राच्या बिल्डिंग खाली एका दारुड्या व्यक्तीने त्यांच्या मित्राच्या पत्नीला अश्लील शब्दात छेडल्यामुळे राज कुमार त्याला ओरडले असताना त्या दारुड्याने शांत बसण्या ऐवजी राजकुमार यांना अर्वाच्य भाषेत शिव्या दिल्यामुळे राजकुमार यांनी त्या दारुड्याला एका काठीचा जोरात फटका मारला. (Actor Rajkumar Jail Controversy)
त्यावर तो दारुडा तिथून निघून गेला परंतु दुसऱ्या दिवशी त्या दारुड्याचा मृत्यू झाला. तिथेच जवळ राहणाऱ्या झोपडपट्टीला एका व्यक्तीने पैसे काढण्याच्या हेतूने राज कुमार यांनीच त्याला मारलं असल्याची साक्ष दिली.
या घटने नंतर राजकुमार यांना अटक झाल्यानंतर जेलमधल्या वातावरणामुळे त्यांची विचारसरणी नकारात्मक होत चालली होती. चित्रपट सृष्टीतील निर्माता आणि दिग्दर्शक चेतन आनंद यांच्या व्यतिरिक्त त्यांना दुसरं कोणीच भेटायला आलं नाही. या घटनेनंतर त्यांचे आयुष्य परत स्थिर सतावत झाले परंतु त्यांचा हसरा बोलका स्वभाव विक्षिप्त स्वभावात बदलत गेला. हा संपूर्ण संदर्भ सेलिब्रिटींच्या गाठीभेटी या पुस्तकातून घेतलेला आहे.