मराठी मालिका विश्वामध्ये लेखक वेगवेगळे विषय घेऊन येत असतात. असाच वेगळा विषय घेऊन “आई कुठे काय करते” ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि या मालिकेने सर्व प्रेक्षकांची मन जिंकली. मालिकेच्या कथे नुसार अरुंधती आणि आशुतोष यांनी लग्न गाठ बांधली असून त्यांचा नवीन संसार सुरु झाला आहे. परंतु आता या मालिकेत एक रंजक वळण आलेले पाहायला मिळणार आहे. (ishaa anish engagement )
आशुतोष चा पुतण्या अनिश आणि अरुंधतीची मुलगी इशा या दोघांच्या मनात एकमेकांविषयी प्रेम आहे. आणि त्यांचं हे प्रेम प्रकरण घरी समजल्यामुळे अनिरुद्ध या नात्याच्या विरोधात आहे. ईशा मात्र अनिश सोबतच लग्न करण्याचा हट्ट धरून बसली आहे.अनिरुद्ध या सगळ्याला जबाबदार अरुंधती आणि आशुतोषलाचं समजतोय.
अनिश आशुतोषचा पुतण्या असल्यामुळे अनिरुद्धच्या मनातला राग अधिकच वाढलेला दिसून येतोय.
हे देखील वाचा: सानिया चा ऑफस्क्रीन चांगुलपणा
आता मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत अरुंधती आशुतोष घरी जात असताना अरुंधती ईशाचाच विचार करत असते. तेवढ्यात आशुतोषला त्याच्या आईचा फोने येतो. आई आशुतोषला सांगते अनिश घरातून कुठे तरी निघून गेलाय. त्यावर अरुंधती आणि आशुतोष घाईने घरी पोहोचतात. एकीकडे अनिरुद्ध ईशाचा फोन तिच्याकडून काढून घेतो आणि तिला खोलीमध्ये कोंडून ठेवतो हे सगळं संजना बघत असते. ती अनिरुद्धच्या थांबण्याचा प्रयन्त्न करते पण तो काही ऐकत नाही. म्हणून संजना अरुंधतीला फोन करते आणि तिला झालेला प्रकार सांगते. (ishaa anish engagement )
हे सगळं ऐकल्यानांतर अरुंधती घरातून लगेच निघते आणि अनिरूध्दच्या घरी पोहोचते. घरी आल्यानंतर अरुंधती यशला खोलीचं दार तोडायला सांगते. ते खोलीत गेल्यानंतर त्यांना समाजात ईशा खोलीतून पळून गेली आहे. इकडे आशुतोषच्या घरातून अनिश सुद्धा निघून जातो आणि ईशाला जाऊन भेटतो. तर पुढील भागात आपण पाहणार आहोत अरुंधती ईशाच्या कानाखाली वाजवते आणि ती घरच्याना सांगणार आहे कि ईशा कोणताही चुकीचं पाऊल टाकण्यापेक्षा आपण ईशा आणि अनीशचा साखरपुडा करून देऊयात.