अभिनेत्री ऐश्वर्या नारकर व अभिनेते अविनाश नारकर हे दोघेही सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपलपैकी एक आहेत. ऐश्वर्या व अविनाश यांनी आपापल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. शिवाय सोशल मीडियावरही दोघेही बऱ्यापैकी सक्रिय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात राहत असतात. सोशल मीडियावर ते त्यानक्षहे अनेक फोटो व डान्स व्हिडीओ शेअर करत असतात आणि त्यांच्या या फोटो व व्हिडीओला चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळतो. अशातच हे दोघे मुंबईपासून लांब ट्रीपसाठी गेले आहेत.
मे महिन्याच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी हे दोघे एकत्र बाहेर फिरायला गेले आहेत. त्यांच्या व्यस्त वेळातून वेळ काढत सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी पाचगणी येथे गेले आहेत. ऐश्वर्या यांनी त्यांच्या सोशल मीडियाद्वारे या ट्रीपचे काही खास क्षण शेअर केले आहे, असंतच त्यांनी नुकताच शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ऐश्वर्या यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ते राहत असलेल्या होम-स्टेची खास झलक दाखवली आहे.
ऐश्वर्या व अविनाश राहत असलेला हा होम-स्टे अगदीच जुना असून या ठिकाणी निसर्गातील वस्तूंपासून बनवलेल्या अनेक गोष्टी पाहायला मिळत आहे.. लाकडापासून बनवलेलं हे होम-स्टे खूपच सुंदर असून अत्यंत प्राचीन पण तरीही आधुनिक असं हे होम-स्टे आहे. तसेच ऐश्वर्या यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये त्या निसर्गाचा, वातावरणाचा मनमुराद आनंद घेताना दिसत आहेत.
आणखी वाचा – सायली-अर्जुनच्या हाती लागले महिपतविरुद्धचे पुरावे, आता साक्षीचा पर्दाफाश होणार का?, ‘ठरलं तर मग’ला रंजक वळण
ऐश्वर्या व अविनाश नारकर यांनी त्यांच्या कालच्या व्हिडीओद्वारे “मुंबईच्या धावपळीपासून काही दिवस शांतता मिळावी म्हणून या ठिकाणी आलो आहोत. आम्ही चार दिवसांच्या या ट्रीपवर आलो असून इथून लोकांशी संवाद साधत आहोत.” असं म्हटलं होतं.
आणखी वाचा – नेत्राच्या हातून होणार विरोचकाचा अंत, शक्तीही कामी येईना अन्..; शेखर राजाध्यक्षने दिला अंताचा इशारा
दरम्यान, ऐश्वर्या यांनी नुकताच शेअर केलेला हा व्हिडीओ अनेकांच्या पासनातीस उतरत आहे. या व्हिडीओला चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. “खूप सुंदर”, “खूप छान”, “निसर्गाच्या सानिध्यात नेहमीच आनंदी व फ्रेश वाटते” अशा अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी ऐश्वर्या यांच्या या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे.