बॉलिवूड सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपलपैकी एक म्हणजे अरबाज खान व शूरा खान. अरबाज व शूरा सध्या खुलेपणाने त्यांच्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली. लग्नाआधी दोघांनी आपलं नातं गुपित ठेवलं असलं तरी आता ते उघडपणे एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसतात. अलीकडेच शूरा खानने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ‘आस्क मी एनीथिंग’ सेशन घेतले. यादरम्यान तिने पती अरबाज आणि स्वत:मधील वयातील फरकाबाबत विचारलेल्या प्रश्नालाही समर्पक उत्तर दिले. (Arbaj Khan Wife Sshura Khan On Age)
‘आस्क मी एनीथिंग’ सत्रादरम्यान, एका यूजरने शूरा खानला तिचा पती अरबाज खानच्या वयाबद्दल आणि उंचीबद्दल विचारले, ज्यावर तिने स्पष्टपणे उत्तर दिले. “अरबाज खान ५.१० फूट आहे. मी ५.१ फूट आहे आणि वय फक्त एक संख्या आहे”. मिळालेल्या माहितीनुसार, अरबाज खान ५६ वर्षांचा आहे तर त्याची पत्नी शूरा खान ३५ वर्षांची आहे. सत्रादरम्यान शूरा खानने सांगितले की, अरबाज खानने तिला सर्वप्रथम प्रपोज केले होते. शूराने सांगितले की, ‘पहिली तारीख इतकी चांगली होती की त्यांनी लगेच लग्न करण्याचा निर्णय घेतला’.
याआधी अरबाज खानने स्वत: आणि शूरा खान यांच्या वयातील अंतराबाबत सांगितले होते. ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान तो म्हणाला, “माझी पत्नी माझ्यापेक्षा खूपच लहान आहे. पण ती १६ वर्षांची आहे असे नाही. तिला तिच्या आयुष्यात काय हवं आहे ते माहीत होतं आणि मला माझ्या आयुष्यात काय हवं आहे ते माहीत होतं. हे आम्हाला माहित नव्हते किंवा आम्ही ते एकमेकांपासून लपवले असे काही नाही”.
अरबाज खानचे शूरा खानबरोबर हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी अरबाज खानने मलायका अरोराबरोबर लग्न केले होते. मात्र त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. १९ वर्षे एकत्र राहिल्यानंतर अरबाज खान आणि मलायका अरोरा २०१७ मध्ये वेगळे झाले. दोघांनाही एक मुलगा आहे, त्याचे नाव अरहान खान असे आहे.