हास्यजत्रा आणि त्यातील कलाकार हा प्रेक्षकांसाठी खरंच जवळचा विषय झाला आहे. आज नवीन काय असणार याची वाट प्रेक्षक बघत असतात. आणि आपल्या दमदार परफॉर्मन्स ने कलाकार प्रेक्षकांचं हे वाट बघणं सार्थ ठरवतात.आपल्या कामातून लोकांना खळखळून हसवणं त्यांच्या धकाधकीच्या लाइफस्टाइल मधून त्यांना थोडा निवांतपणा देणं या पेक्षा मोठं काय असू शकत. आणि हास्यजत्रेतील कलाकार ते काम १०० टक्के देऊन करतात यात काही शंका नाही.(Namrata Rudraaj)
हास्यत्रेतील आपली लाडकी लॉली म्हणजेच अभिनेत्री नम्रता संभेराव. तिची ,प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना आपलीशी वाटते. आणि तिच्या प्रत्येक कामावर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात , प्रतिसाद देतात. तिचे हावभाव विनोदाचं टाईमिंग याला काही तोड नाही. ती लॉली असो किंवा तीच आईच पात्र असो ती स्टेज वर कमालच करते. हास्यजत्रे व्यतिरिक्त नम्रताच सध्या कुर्रर्रर्रर्र नाटक जोरदार गाजतंय. या नाटकात नम्रता मुख्य भूमिकेत पाहायला मिळते. यात ती पूजा नावाचं पात्र साकारतेय. आणि तीच हे पात्र ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. तसेच या नाटकाने १०० प्रयोगांचा टप्पा पार केला आहे.
पहा काय आहे नम्रताची पोस्ट (Namrata Rudraaj)
याच नाटकच्या प्रयोगासाठी अमेरिका दौऱ्यावर वर जाणार असल्याची बातमी नम्रताने तीन दिवसांपूर्वी प्रेक्षकांसोबत शेअर केली होती. कुर्रर्रर्र नाटकाचे प्रयोग ७ एप्रिल पासून महिनाभर अमेरिकेत पार पडणार असल्याची माहिती तिने दिली होती. आणि त्याच दौऱ्यासाठी निघतानाची एक भावुक पोस्ट तिने, निघालो साता समुद्रापलीकडे फॅमिली पासून दूर, महिनाभर लेकरापासून लांब चाललेय. जड पावलांनी निरोप घेताना ऊर भरून आला होता. पण हरकत नाही नाटकाचा अमेरिका दौरा यशस्वीरीत्या पार करून येऊ लवकरच, तूर्तास बाय बाय. असे कॅप्शन देत इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केलीय. (Namrata Rudraaj)

तिच्या या दौऱ्यासाठी प्रेक्षकांसोबत खुशबू तावडे, श्रेया बुगडे या मराठी अभिनेत्रींनी ही शुभेच्छा दिल्या आहेत. अनेकांनी मिस यु लॉली लवकर परत ये अशा ही कमेंट केल्या आहेत. कलाकार म्हणून काम करत असताना अनेक भावनिक गोष्टींना सामोरं जावं लागत असत.महिनाभर आपल्या मुला पासून लांब राहणं कोणत्याच आई साठी सोप्प नसत. पण या सगळ्या गोष्टीं वर मात करून प्रेक्षकांचे लाडके कलाकार कायम प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज असतात.
हे देखील वाचा: नम्रता, प्रसाद लवकरच गाजवणार अमेरिका
अनेक वर्ष नम्रता तिच्या कमाल शैलीत प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. हास्यजत्रेपूर्वी ती कॉमेडी एक्सप्रेस या शो मध्ये ती होती.छोटा पडदा नाटक या व्यतिरिक्त नम्रताने मोठ्या पडद्यावर देखील तिच्या कामाची छाप पाडली आहे. वाळवी, बांबूं यांसारख्या चित्रपटात तिने विशेष भूमिका केल्या आहेत. (Namrata Rudraaj)