अभिनेत्री यामी गौतम ही बॉलिवूडमधील काही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अभियनाबरोबरच यामीच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने तिच्या गरोदरपणाची गुडन्यूज शेयर केली होती. तेव्हापासून तिचे अनके चाहते तिच्या या गुडन्यूजची वाट पाहत होते. अशातच यामीबद्दल एक आनंदाची बातमी समजत आहे. अभिनेत्री आई झाली असून तिला मुलगा झाला आहे.
यामी व तिचा पती आदित्य यांनी ही आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. त्यांनी एक खास पोस्ट शेअर करत त्यांच्या घरातल्या चिमूकल्याबद्दलची गुडन्यूज शेअर केली आहे. त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या मुलांचे नावही जाहीर केले आहे. यामीने सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर करताच तिच्या बाळाच्या नावाची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. यामीच्या बाळाच्या नावाचा नेमका अर्थ काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
यामीने मुलाचे नाव ‘वेदविद’ ठेवले असल्याचे या पोस्टमध्ये सांगितलं आहे. ‘वेदविद’ हा एक संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ ‘वेद जाणणारा’ असा होतो. तसेच ‘वेदविद’ हे भगवान विष्णूचेही एक नाव आहे. या खास पोस्टमध्ये यामी व आदित्य यांनी सर्वांचे आभार मानत असं म्हटलं आहे की, “आम्ही पालकत्वाच्या या सुंदर प्रवासाला सुरुवात करत असताना, आमच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्याची आतुरतेने अपेक्षा करत आहोत”.
आणखी वाचा – मुलगा झाला हो! यामी गौतम झाली आई, नावही केलं जाहीर, म्हणाली, “आमच्या मुलाच्या”
यामीने शेअर केलेल्या या पोस्टखाली मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांनी अभिनेत्रीला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच तिच्या अनेक चाहत्यांनीही कमेंट्सद्वारे अभिनंदन असं म्हटलं आहे. रणवीर सिंग, आयुष्मान खुराना, मृणाल ठाकूर, राशि खन्ना यांच्यासह अनेक बॉलिवूड कलाकारांनी कमेंट्सद्वारे यामी-आदित्यचे अभिनंदन केले आहे.
आणखी वाचा – Video : गरोदर बायकोची काळजी घेताना दिसला रणवीर सिंह, दीपिका पदूकोणने दाखवला बेबीबम्प, व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, यामी गौतम आणि आदित्य धर यांचा विवाह ४ जून २०२१ रोजी झाला होता. दोघांनी २ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता आणि लग्नाच्या तीन वर्षांनी या जोडप्याने एका चिमूकल्याला जन्मही दिला आहे.