‘पारू’ या मालिकेच्या भागात असं पाहायला मिळत आहे की, अहिल्यादेवींनी अत्यंत चलाकीने सूर्यकांत कदमच्या तावडीतून श्रीकांतची सुटका केलेली असते आणि सूर्यकांत कदमला पोलिसांच्या तावडीतही दिलेलं असतं. मॅजिक पेनचा वापर करून अहिल्यादेवींनी सूर्यकांत कदमला फसवलेलं असत आणि गावकऱ्यांच्या जमिनी पुन्हा त्यांना दिलेल्या असतात तर हे पाहून सूर्यकांत कदमलाही धक्का बसतो आणि तो म्हणतो की लवकरच मी पुन्हा परत येईन आणि याचा बदला घेईन. (Paaru Serial Update)
अहिल्यादेवी म्हणतात की, तू पुन्हा परत ये मी बघतेच आणि पुढच्या वेळेला मी तुला पोलिसांच्या ताब्यात देणार एवढी वेळच येऊ देणार नाही. त्यानंतर श्रीकांतला घेऊन सगळेजण घरी येतात तेव्हा पारू श्रीकांत व देवी आईला ओवाळते आणि त्यांची दृष्ट काढते आणि पारु श्रीकांत सरांना ओरडते की, मी तुम्हाला सांगितला होत ना तुमची स्वतःची आणि देवी आईची काळजी घ्या, तरी तुम्ही दुर्लक्ष केलं यावर श्रीकांत आता आम्ही सुखरूप असल्याचे सांगतो. त्यानंतर सगळेजण घरात जातात तेव्हा अहिल्यादेवी श्रीकांतशी बोलत असतात की, मी तुझ्याशिवाय एकट राहण्याचा विचारही करू शकत नाही. तुला जर काही झालं असतं तर. यावर श्रीकांत म्हणतो, काळजी करू नकोस तू असताना मला काही होणार नाही. मी फ्रेश होऊन येतो असं म्हणत तो जात असतो तितक्यातच तिथं प्रीतम येतो आणि श्रीकांतला पाहून ढसाढसा रडू लागतो आणि सांगतो की मला कळतच नव्हतं नेमकं काय सुरू आहे आणि काय करायचं होतं. मला खूप भीती वाटली यावर श्रीकांत प्रीतमला घट्ट मिठी मारतो आणि त्याची समजूत काढतो.
बंगल्याबाहेर पारूने रांगोळी काढलेली असते ती पाहून दामिनी अहिल्यादेवींकडे चुगली करते मात्र अहिल्यादेवींना ती रांगोळी प्रचंड आवडते त्यानंतर अहिल्यादेवी पारुला सांगतात की, तुझी शिक्षा संपली आहे आजपासून तू घरात येऊ शकते तर इकडे प्रीतम त्या गावाकडच्या टीचर मॅडमचा भास होत असतो आणि त्या तिला दिसत असतात तितक्यात पारू प्रीतमच्या खोलीत येते आणि प्रीतम शुद्धीवर येतो. त्यानंतर पारू व प्रीतम मिळून आदित्यच्या खोलीत जातात तेव्हा आदित्य ब्रँड अँबेसिडरसाठी निवडलेल्या डोळ्यांशी बोलत असतो आणि त्या डोळ्यांकडे पाहत गालातल्या गालात हसत असतो हे पाहून प्रीतम आदित्यची फिरकी घ्यायचा ठरवतो. त्यानंतर त्या डोळ्यांचा फोटो घेऊन प्रीतम म्हणतो की, तु या डोळ्यांच्या या मुलीच्या प्रेमात पडला आहेस असं म्हणतो. ते डोळे घेऊन पळत पळत खाली येतो तर इकडे अहिल्यादेवी आणि सगळेजण बसलेले असतात. तेव्हा तो अहिल्यादेवींना म्हणतो, आई हा दादा या डोळ्यांच्या प्रेमात पडला आहे तो या डोळ्यांकडे पाहून बोलत होता हवं तर तू पारूला पण विचार आणि त्यानंतर तो आदित्यला सांगतो की, हे डोळे कोणाचे आहे त्याचा शोध लाव आणि या मुलीशी लग्न कर म्हणजे तुझा प्रॉब्लेम सॉल्व होईल.
त्यानंतर मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, अहिल्यादेवी सांगतात की आदित्य माझ्या शब्दाबाहेर नाही मी सांगेन त्या मुलीशी तो लग्न करेल हे मात्र नक्की. आता मालिकेच्या येणाऱ्या भागात त्या डोळ्यांचा खरा चेहरा समोर येणार का?, आदित्य डोळ्यांच्या प्रेमात पडलेला असल्याने ते डोळे असलेल्या व्यक्तीशी तो लग्न करणार का हे सर्व पाहणे रंजक ठरेल.