बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय तिच्या हटके अदांनी सोशल मीडियावर चर्चेत असते. तिच्या हटके अदांनी ती सर्वांचे लक्ष वेधून घेते. अभिनयाबरोबरच ऐश्वर्या तिच्या खासगी आयुष्यासाठीदेखील खूप चर्चेत असते. काही दिवसांपासून सोशल मीडियासह सतत एक चर्चा रंगताना दिसत आहे की, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यामधील वाद वाढला असून ते दोघे एकमेकांपासून वेगळे होणार आहेत. तसेच ऐश्वर्या व बच्चन कुटुंबियांमध्येही काही आलबेल नसल्याचे चित्र अनेक दिवसांपासून पाहायला मिळत आहे. तसेच जया बच्चन व ऐश्वर्या या सासू-सूनांमध्येही खटके उडत असल्याच्या बातम्या व्हायरल झाल्यात.
अशातच जया बच्चन यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यावरून नेटकरी जया बच्चन यांच्यावर चांगलेच चिडलेले पाहायला मिळत आहे. यात जया बच्चन यांच्याबरोबर बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटादेखील दिसत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये जया बच्चन व प्रीती झिंटा ऐश्वर्याच्या मागे उभ्या राहून ती बोलत असताना काही हावभाव करत आहेत. त्यामुळे नेटकरी व ऐश्वर्याचे अनेक चाहते जया बच्चन व प्रीती झिंटा यांच्याबद्दल अनेक प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ एका अवॉर्ड फंक्शनचा आहे. ज्यात जया बच्चन आणि प्रीती झिंटा देवदाससाठी ऐश्वर्याला पुरस्कार देतात. त्यानंतर ऐश्वर्या तिथे उभी राहते आणि भाषण देऊ लागते. तेव्हा प्रीती झिंटा व जया बच्चन ऐश्वर्याच्या पश्चात तिच्याविषयी काहीतरी बोलताना दिसत आहेत. तसेच जया बच्चन खिल्ली उडवताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी जया बच्चन यांच्याविषयी नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत.
आणखी वाचा – सासूबाईंचं हृता दुर्गुळेवर आहे जीवापाड प्रेम, सून व लेकाचा रोमॅंटिक व्हिडीओ पाहून म्हणाल्या, “तुम्ही दोघं…”
दरम्यान, ऐश्वर्या रायने २००७मध्ये जया बच्चन यांचा मुलगा अभिषेकबरोबर लग्न केले होते. या जोडप्याला आराध्या बच्चन ही मुलगीही आहे. आराध्या तिच्या आईसारखी दिसते. नुकत्याच ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये ती तिच्या मुलीबरोबर दिसली होती. या सोहळ्यामधील त्यांचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.