‘झी मराठी’ वाहिनीवरील सर्वच मालिका सध्या तुफान लोकप्रियता मिळवत आहेत. नवनवीन कथानक घेऊन आलेल्या या मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. अशातच सध्या या मालिकांमधील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ही मालिका प्रेक्षकांनी उचलून धरली आहे. मालिकेत येणाऱ्या रंजक वळणांमुळे ही मालिका सध्या अव्वल ठरत आहे. या मालिकेत अक्षरा, अधिपती, भुवनेश्वरी, चारूहास, सरगम या पात्रांचा अभिनय पाहणंही रंजक ठरत आहे. मालिकेत येणाऱ्या रंजक वळणांमुळे ही मालिका अधिक जोरात सुरु आहे. (Tula Shikvin Changlach Dhada Promo)
सध्या मालिकेत अधिपतीचा गाण्याचा प्रवास सुरु आहे. अधिपतीला गाणं शिकवण्यासाठी सरगम मॅडमना भुवनेश्वरी घेऊन येते. मात्र ही तिची चाल असते. अधिपतीच्या गळ्यात पडून त्याला अक्षरापासून लांब करण्यासाठी भुवनेश्वरी सरगमला पैसेही देते. सरगम शिकवणी सोडून अधिपतीच्या जवळ जाण्याचा, त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असल्याचं एकीकडे अक्षरा ओळखून असते. त्यामुळे अक्षरा सरगम व अधिपती यांच्यावर लक्ष ठेवून असते.
अक्षरा व अधिपती यांचं एकमेकांवर प्रेम असलं तरी त्यांनी अद्याप प्रेमाची कबुली दिलेली नसते. त्यामुळे अक्षरा व अधिपती एकमेकांना प्रेमाची कबुली केव्हा देणार याकडे सार्यांच्या नजरा वळून राहिल्या आहेत. अशातच मालिकेच्या एका प्रोमोने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यांत अक्षरा अधिपतीची वाट पाहत सोफ्यावरच झोपून जाते. अधिपती जेव्हा येतो तेव्हा अक्षराला सोफ्यावर झोपलेलं पाहून तो तिची मान सरळ करायला जातो. अक्षरा गाढ झोपेत असते. तेव्हा अधिपती अक्षराकडे पाहत राहतो.
अक्षराची तो काळजी घेत असताना मनातल्या मनात असंही म्हणतो की, “शाळेत विद्यार्थ्यांसमोर कसं घडाघडा बोलता, आणि आमच्यासमोर मात्र चिडलेल्या असता. जेव्हा तुम्ही प्रेमाची कबुली द्याल ना, तेव्हा हजारो जन्माची पुण्याई कामी आली असं समजू आम्ही”. आता अधिपतीही अक्षरा प्रेमाची कबुली कधी देणार याकडे डोळे लावून बसलेला असतो. अक्षरा अधिपतींवरील प्रेमाची कबुली देणार का?, दोघांमधील प्रेम फुलणार का?, हे सर्व पाहणं मालिकेत रंजक ठरेल.