२०२० मध्ये, बॉलिवूड अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी अलाया फर्निचरवालाने ‘जवानी जानेमन’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पूजा बेदीचे आजोबा कबीर बेदी हेदेखील उत्कृष्ट कलाकार आहेत. अलीकडेच ‘बॉलिवूड बबल’ला दिलेल्या एका मुलाखतीत आलिया फर्निचरवालाने तिच्या आईच्या घटस्फोटाबद्दल संवाद साधला. यावेळी अभिनेत्रीने पूजा बेदीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले.
यावेळी अलाया म्हणाली, “माझे आई-वडील घटस्फोटानंतर त्यांच्या वेगळ्या वाटेने गेले. पण मी त्यांना नेहमी एकत्र पाहायचे. त्यांचे एकमेकांशी खूप मैत्रीपूर्ण नाते होते. आजही ते खूप चांगले मित्र आहेत. माझ्या आईने माझ्या वडिलांच्या दुसऱ्या लग्नालाही हजेरी लावली होती आणि मीसुद्धा माझ्या सावत्र आईच्या खूप जवळ आहे. माझी आई आणि सावत्र आई यादेखील माझ्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत”.
यापुढे मुलाखतीत अलाया असं म्हणाली की, “माझा सावत्र भाऊ, ज्याला मला सावत्र भाऊ म्हणायलाही आवडत नाही. कारण तो माझा भाऊ आहे. आमचे आई-वडील वेगवेगळे झाले आहेत. पण तरी ते माझ्या हृदयाच्या तुकड्यासारखे आहेत. माझ्या पालकांचा घटस्फोट होणे ही माझ्यासाठी नेहमीच मोठी सकारात्मक गोष्ट राहिली आहे. ते दोघेही आपापल्या आयुष्यात आनंदी आहेत”.
यापुढे अलायाने घटस्फोटाविषयी तिचं मत व्यक्त करत असं म्हटलं की, “घटस्फोट माझ्यासाठी कधीही वाईट गोष्ट नव्हती. कारण माझ्या पालकांनी त्यांचा घटस्फोट अतिशय सुंदरपणे हाताळला. जेव्हा माझ्या इतर मित्रालाही अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला तेव्हा मला वाटले नाही की ही खूप मोठी गोष्ट आहे.
दरम्यान, अलायाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती नुकतीच ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटामध्ये दिसली होती. या चित्रपटात अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, पृथ्वीराज सुकुमारन व मानुषी छिल्लर या कलाकारांच्या प्रमुख भूमिका होत्या.