रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रजनीकांत यांच्या लेकीचा मोडला संसार, लग्नानंतरही दोघांचंही दुसऱ्या व्यक्तीबरोबर सुरु होतं अफेअर, बारमध्ये जायचे अन्…

Saurabh Moreby Saurabh More
मे 16, 2024 | 2:14 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Rajinikanth's daughter Aishwarya and son-in-law Dhanush were separated due to their extramarital affairs

रजनीकांत यांच्या लेकीचा मोडला संसार, लग्नानंतरही दोघांचंही दुसऱ्या व्यक्तीबरोबर सुरु होतं अफेअर, बारमध्ये जायचे अन्...

मनोरंजन विश्वात गेल्या काही काळात अनेक कलाकार मंडळी विवाहबंधनात अडकले आहेत आणि या विवाहबंधनात अडकलेल्या काही जोडप्यांचा काडीमोडही झाला आहे. यातील काही जोडप्यांनी अनेक वर्ष आपला संसार टिकवला. काही जोडप्यांच्या संसारात कुरबुरी असल्याच्या चर्चा आहेत. आता प्रसिद्ध गायिकेने एका लोकप्रिय व सुप्रसिद्ध जोडप्याच्या घटस्फोटाबाबत मोठा दावा केला आहे. मागील १८ वर्षांपासून सुरू असलेल्या संसारात या दोन्ही कलाकारांचे विवाहबाह्य संबंध असल्याचे दावा या गायिकेने केला आहे. 

हे प्रसिद्ध जोडपे दुसरे-तिसरे  कोणी नसून दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या व धनुष हे आहे. या जोडप्याने २०२२ मध्ये घटस्फोटाची घोषणा करत त्यांचे नाते संपले असल्याचे जाहीर केले. खरं तर, १७ जानेवारी २०२२ रोजी धनुषने सोशल मीडियाद्वारे जाहीर केले होते की, तो व पत्नी ऐश्वर्या लग्नाच्या १८ वर्षानंतर वेगळे होत आहेत. त्याने चेन्नईच्या कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी अधिकृतपणे अर्जही दाखल केला होता. मात्र या दोघांनी घटस्फोटामागील कारण कधीच स्पष्ट केलं नव्हतं. घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केल्यापासूनच दोघं वेगवेगळे राहत आहेत. अशातच आता गायिका सुचित्राने या दोघांच्या नात्याविषयी धक्कादायक खुलासा केला आहे. 

View this post on Instagram

A post shared by Dhanush (@dhanushkraja)

आणखी वाचा – अधिपतीही सरगम मॅडमच्या प्रेमाच्या जाळ्यात फसणार का?, अक्षराचा संसार मोडण्यासाठी भुवनेश्वरीचे जोरदार प्रयत्न, प्रेम बहरणार का?

‘एबीपी’च्या वृत्तानुसार कुमुदम या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सुचित्राने धक्कादायक खुलासा केला असून धनुष व ऐश्वर्या या दोघांनी एकमेकांची फसवणूक केल्याचे सांगितले. धनुष व ऐश्वर्या एकत्र असतानाही ते वेगवेगळ्या लोकांबरोबर डेटवर जात होते, असा दावाही सुचित्राने केला आहे. “धनुषने मला फसवलं, असा आरोप ऐश्वर्या करते आहे. पण तिनेसुद्धा विवाहित असताना धनुषची फसवणूक केली आहे. हा दुटप्पीपणा झाला ना? ऐश्वर्याने धनुषला फसवलं आणि धनुषने ऐश्वर्याला फसवलं. ही एक अशी जोडी आहे, ज्यामध्ये दोघांनीही एकमेकांचा विश्वासघात केला आहे”, असं सुचित्रा म्हणाली.

आणखी वाचा – “कोर्टाची तारीख जवळ येत आहे म्हणून…”, राखी सावंत आजारपणाचं ढोंग करत असल्याचा आदिल खानचा दावा, म्हणाला, “खरंच आजारी असेल तर…”

यावर मुलाखतकाराने “इतके गंभीर आरोप तू कोणत्या आधारावर करते आहेस?” असा प्रश्न विचारला असता सूचित्राने सांगितलं की, “ऐश्वर्या व धनुष हे विवाहित असताना दुसऱ्या व्यक्तींबरोबर डेटवर जायचे. ते बारमध्ये बसायचे आणि ज्या व्यक्तीला डेट करत आहेत, त्यांच्याबरोबर मद्यपान करायचे.” यावर निवदकाने “डेटवर जाणे ही सामान्य गोष्ट आहे.” असे म्हटले. यावर सुचित्राने “जेव्हा तुम्ही विवाहित असता, तेव्हा दुसऱ्या व्यक्तीबरोबर डेटवर जाणं सर्वसामान्य आहे का?” असा प्रश्नात्मक उत्तर दिले. दरम्यान, “मित्र, जोडीदार आणि पालक म्हणून १८ वर्षे एकमेकांबरोबर राहिल्यानंतर आमचे मार्ग आता वेगळे होत आहेत. आमच्या या निर्णयाचा आदर करा आणि आम्हाला समजून घ्या”, असं म्हणत त्यांनी घटस्फोट घेतला होता.

Tags: Aishwarya-Dhanush Divorce NewsAishwarya-Dhanush NewsSouth Entertainment News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
cannes festival dog entry

Cannes च्या रेड कार्पेटवर अभिनेत्री नव्हे तर श्वानाचीच हवा, उपस्थितही बघतच बसले अन्…; कोण आहे हा मेस्सी?,

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.