‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेली अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. या मालिकेच्या कथानकाच्या व कलाकारांच्या अभिनयाने नेहमीच ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहिली. या मालिकेतील दयाबेन या पात्राने प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यानंतर दयाबेन या पात्राची मालिकेतून एक्झिट झालेली पाहायला मिळाली. दरम्यान, दयाबेन या पात्राला प्रेक्षक मिस करताना दिसत आहेत. दयाबेन मालिकेत केव्हा परतणार याकडे सारे प्रेक्षक डोळे लावून बसले आहेत. गेल्या सात वर्षांपासून असलेली या दयाबेन पात्राची प्रतीक्षा आता संपली आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये दिशा वकानी नाहीतर नवीन दयाबेन येणार आहे. निर्माते असित मोदी यांनी चाहत्यांना अनेक आश्वासने दिली मात्र ती ते पूर्ण करु शकले नाहीत. त्यामुळे लोकांनीही आशा सोडली. पण आता असे होणार नाही. (Dayaben Entry In TMKOC)
याबाबतचा खुलासा खुद्द मालिकेतील एका अभिनेत्रीने केला आहे. जेनिफर मिस्त्री या अभिनेत्रीने मालिका सोडली असली तरी तिने याबाबतचा खुलासा केला. अभिनेत्रीने असा खुलासा केला की, दयाबेन या पात्राची लवकरच मालिकेत एंट्री होणार आहे, जी दिशा वकानीच्या जागी दिसणार आहे. अभिनेत्रीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये ती सांगत आहे की, ज्या अभिनेत्रीला गेल्या तीन वर्षांपासून ही भूमिका करण्यासाठी बोलावले जात होते ती आता येणार आहे. ती वयाने तरुण असली तरी तिच्या नावाला मंजुरी मिळण्यास विलंब होत आहे.
जेनिफर मिस्त्रीने पुढे सांगितले की, “ती मुलगी दया हे पात्र साकारणार आहे. त्यासाठी तिला दिल्लीहून मुंबईला बोलावले जाणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून या पात्रासाठी तिचे ऑडिशन घेतले जात आहे. मात्र या पात्रासाठी ती फारच तरुण आहे. कदाचित २८-२९ वर्षांची ती असेल. अशा परिस्थितीत तिच्या आणि जेठालालच्या वयात खूप फरक जाणवेल. तिने वेगवेगळे मॉक शूटही केले आहेत. पात्रासाठी तयारी सुरु आहे. ती कधी येईल याबाबत अद्याप माहीती नाही”. जेनिफरने या पात्रासाठी निवडल्या जाणाऱ्या अभिनेत्रीचे नाव उघड केलेले नाही. मात्र आता आणखी प्रतीक्षा करावी लागणार नाही हे निश्चित झाले आहे.
दयाबेन हे पात्र साकारणाऱ्या दिशा वकाणीने प्रेग्नेंसीमुळे ही मालिका सोडली होती. मात्र ती पुन्हा मालिकेत परतणार अशी चर्चा होती पण तसे झाले नाही. तब्बल सात वर्षांनी आता पुन्हा मालिकेत दयाबेन पाहायला मिळणार आहे. दिशाच्या दयाबेन या पात्राने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. आता या जागी दुसरी कोणी अभिनेत्री प्रेक्षक पाहू शकत नव्हते कारण तिची बोलण्याची पद्धत पूर्णपणे भिन्न होती. कदाचित त्यामुळेच या पात्रासाठी अभिनेत्री शोधण्यास वेळ लागला असावा.