‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेने नुकतेच आजपर्यंत अनेक उत्कंठावर्धक भाग पूर्ण केले आहेत. या मालिकेत मागील काही भागांपासून अनेक ट्वीस्ट येत असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. मालिकेत रोज नवीन ट्विस्ट आणि रहस्य उलगडताना दिसत आहेत. मालिकेत रुपालीने राजाध्यक्ष कुटुंबियांना वश केले असल्याचा ट्विस्ट सध्या पाहायला मिळत आहे.
त्यामुळे राजाध्यक्ष कुटुंबियांना यातून बाहेर कसे काढायचे?, रुपाली किंवा विरोचकाच्या तावडीतून सर्वांना सोडवायचे कसे? असा प्रश्न नेत्रा व इंद्राणी यांना पडला आहे. त्यात त्रिनयना मुर्च्छित पडल्यामुळे देवी आईकडून कोणतीच मदत मिळणं कठीण झालं आहे. त्यामुळे आता नेत्रा व इंद्राणी या कुटुंबियांच्या काळजीत पडल्या आहेत.
रुपालीच्या या वश करण्याच्या युक्तीबद्दल आता नेत्रा व इंद्राणी यांना माहिती झाली असून या नवीन प्रोमोमध्ये नेत्रा व इंद्राणी रुपालीच्या डोळ्यांत तिखट मसाला टाकताना दिसत आहेत. त्यानंतर त्या दोघी व अद्वैत रुपालीच्या गळ्यात साखळदंड अडकवून तिला एका कालकोठरीत डांबतानाचे पाहायला मिळत आहे. यावेळी नेत्रा व इंद्राणी रुपालीला “त्रिनयना देवीच्या भक्तांनी तुला आता अडकवलं आहे. त्यामुळे आता मरेपपर्यंत इथेच राहायचं.” असं म्हणताना दिसत आहेत.
आणखी वाचा – सायली-अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे उरलेत शेवटचे दोन दिवस, दोघेही कायमचे वेगळे होणार का?, मालिकेला रंजक वळण
अशातच आणखी एक नवीन प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये नेत्रा असं म्हणताना दिसत आहे की, “आता मी जे काही केलं आहे त्यामुळे विरोचक विचारात पडेल आणि त्याच्या हे लक्षात येईल की, त्याच्या मृत्यूपेक्षा त्याच्याबरोबर होणारे हे खेळ जास्त त्रास देत आहेत आणि विरोचक तीच गोष्ट करणार ज्यामुळे आपल्याला जास्त त्रास होईल.” अशातच नुकत्याच झालेल्या भागात नेत्राने विरोचकाचा बळी न घेता त्याच्याबरोबर क्रूरपणे वागतानाचे पाहायला मिळाले.
आणखी वाचा – मकर व कुंभ राशीसह ‘या’ राशींना आर्थिक नुकसान होण्याची शक्यता,तर काहींना नोकरीत मिळणार बढती, जाणून घ्या…
त्यामुळे आता अखेर त्रिनयना देवीच्या लेकींना रुपालीच्या शक्तीविरुद्ध लढण्याचे तंत्र आता माहीत झाले असून रुपाली आता त्यांच्या ताब्यात आली आहे. त्यामुळे आता नेत्रा व इंद्राणी राजाध्यक्ष कुटुंबियांना कसं सोडवणार?, रुपालीच्या या ताब्यात जाण्यामुळे विरोचकाचा अंत होणार का? हे मालिकेत पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.