निर्माता, दिग्दर्शक करण जोहर नेहमीच त्याच्या वैयक्तिक गोष्टींमुळे चर्चेत असतो. बरेचदा तो ट्रोलिंगच्या कचाट्यात अडकलेला ही पाहायला मिळाला. अशातच करण जोहरने जाहीरपणे त्याची खिल्ली उडवल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ती म्हणाली की, “इंडस्ट्रीतील लोकांनी आपली खिल्ली उडवली याचे मला खूप दुःख आहे”. जर ट्रोलर्सने त्याला टार्गेट केले असते आणि असभ्य टिप्पण्या केल्या असत्या तर कदाचित त्याला इतके वाईट वाटले नसते परंतु तो इंडस्ट्रीतील लोकांमुळे दुखावला आहे. (Karan Johar Slams Comedian)
करण जोहरने सांगितले की, “तो घरी त्याची आई हिरू जोहरबरोबर बसून टीव्ही पाहत होता. त्यानंतर एका शोचा प्रोमो त्याच्या समोर आला. ज्यामध्ये त्याची अपमानजनक मिमिक्री करण्यात आली होती. या गोष्टीने करण जोहरला इतका त्रास दिला की, त्याने त्याच्या इन्स्टा स्टोरीमध्ये एक नोट लिहून त्याची नक्कल करणाऱ्या व्यक्तीला फटकारले. मात्र, त्यांने कोणाचेही नाव घेतले नाही”.

करण जोहरने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले आहे की, “मी माझ्या आईबरोबर टीव्ही पाहत होतो. आणि मी एका मोठ्या टीव्ही चॅनलवर एका रिॲलिटी कॉमेडी शोचा प्रोमो पाहिला. एक विनोदी कलाकार माझी कॉपी करत होता”. त्याने पुढे लिहिले की, “मी ट्रोल व अनोळखी लोकांकडून हीच अपेक्षा करतो, परंतु जेव्हा तुमचं स्वतःच टॅलेंट २५ वर्षांहून अधिक काळ या व्यवसायाशी संबंधित असलेल्या व्यक्तीचा अनादर करण्यात वापरता तेव्हा ते त्या ठिकाणाविषयी आणि त्या परिस्थितीचा आढावा देत. यामुळे मला रागही येत नाही, पण मला दुःखी वाटत आहे”.

या पोस्टवर एकता कपूरने करण जोहरचे समर्थन केले आहे. तिने करणसाठी एक पोस्ट देखील शेअर केली, जी दिग्दर्शकाने त्याच्या इन्स्टा स्टोरीमध्ये पुन्हा पोस्ट केली आणि एकताचे आभार मानले. एकता कपूर म्हणाली, “असे अनेकदा घडते. अशोभनीय विनोद, कधी कधी शो आणि अवॉर्ड शोमध्येही असे घडते, त्यानंतर तुम्ही तिथेच बसून राहावे अशी त्यांची अपेक्षा आहे. करण, कृपया त्यांना सांगा की ही तुमच्या एखाद्या चित्रपटाची किंवा क्लासिकची मिमिक्री करुन दाखवा”.