‘फु बाई फू’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ यांसारख्या अनेक विनोदी कार्यक्रमांतून घराघरातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार. विशाखा यांनी केवळ विनोदी भूमिकाच न करता विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. विशाखा यांनी पोट धरुन हसवणाऱ्या विनोदी भूमिकेसह, राग व चीड येईल अशी खलनायिकाही उत्तमरित्या निभावत आहे आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘शुभविवाह’ मालिकेत त्या साकारत असलेल्या ‘रागिणी’.
आपल्या अभिनयाने चर्चेत राहणाऱ्या विशाखा या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत येत असतात. त्या सोशल मीडियाद्वारे त्यांचे वैयकटीक आयुष्यातील काही घटना, प्रसंग किंवा किस्से शेअर करत असतात. अशातच त्यांनी नुकताच ‘इट्स मज्जा’बरोबर खास संवाद साधला. यावेळी ‘इट्स मज्जा’च्या ‘My First’ या खास सेगमेंटमध्ये त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केले.
आणखी वाचा – शुक्रवारच्या शिवयोगामुळे ‘या’ ५ राशींना होणार धनलाभ, तर ‘या’ राशींची होणार व्यवसायात भरभराट
विशाखा यांना ‘इट्स मज्जा’च्या ‘My First’ या खास सेगमेंटमध्ये त्यांच्या पहिल्या ब्रेकअपबद्दल विचारण्यात आले. यावेळी त्यांनी “माझा पहिला ब्रेकअप दहावीत असताना झाला होता” असं म्हटलं. तसेच या खास सेगमेंटमध्ये त्यांना त्यांना मिळालेल्या पहिल्या प्रेमपत्राबाबतही विचारण्यात आले. यावेळी त्यांनी असं म्हटलं की, “आठवीत असताना मला एका मुलाने प्रेमपत्र दिलं होतं. छान स्टिकर्स, रेडियम आणि फुलं वगैरे लावलेलं प्रेमपत्र त्याने मला दिलं होतं. दीड पानांचं ते प्रेमपत्र होतं. पण मी ते माझ्या बाईंना दिलं आणि त्याला खूप मार बसला.”
आणखी वाचा – माहेरची साडी सेंटर, चाळ व मेट्रो स्टेशन, इतका भव्यदिव्य आहे डॉ. निलेश साबळेच्या नव्या शोचा सेट, पाहा व्हिडीओ
दरम्यान, विशाखा यांनी अनेक विनोदी कार्यक्रमांतून विनोदी स्किट्सद्वारे प्रेक्षकांना हसवले आहे. त्याचबरोबर त्यांनी अनेक चित्रपटांतूनही अभिनय केला आहे. सध्या त्या स्टार प्रवाह वहिनीवरील ‘शुभविवाह’ या मालिकेतून खलनायिकेची भूमिका साकारत आहेत.