‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून विनोदी कलाकार स्नेहल शिदम आता घराघरात लोकप्रिय ठरतेय. स्नेहल आता या कार्यक्रमाचा एक महत्वाचा घटक बनली आहे. स्नेहलशिवाय ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाचा एक भाग पूर्ण होत नाही असं म्हणायला हरकत नाही. अशा या हरहुन्नरी अभिनेत्रीने ‘माझा होशील ना’ आणि ‘भागो मोहन प्यारे’ या मालिकांतून प्रेक्षकांना तिच्या अभिनयाची भुरळ पाडली.आज स्नेहल लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. परंतु, स्नेहलचा इथवरचा प्रवास मुळीच सोपा नव्हता.पण तिच्या या प्रवासात खडतर प्रवासात तिच्या घरच्यांनी साथ दिली आहे असं ती नेहमी मुलाखतीत सांगत असते. स्नेहल ही सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते. ती नेहमी तिच्या जवळच्या व्यक्तींसाठी खास पोस्ट शेअर करत असते. असं नुकतंच तिने एक व्हिडीओ शेअर करत तिच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं सांगत तिच्या भावाचं कौतुक केलं आहे.(snehal shidam)
स्नेहल शिदमने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडिओत त्यांनी नवीन स्कुटी खरेदी केलेली पाहायला मिळते. पण ही स्कुटी स्नेहलने स्वतः नाही तर तिच्या भावाने खरेदी केली आहे. यासंबंधित तिने भावासाठी स्पेशल पोस्ट केली. New member ,मूल किती पटकन मोठी होतात ना आज सुरज (बाबू) २२ वर्षांचा झाला आणि त्याने स्वतः गाडी घेतली खुप Proud moment आहे. असाच खुप मोठा हो प्रगती कर तुझी सगळी स्वप्नं पूर्ण होऊ देत आणि ती तू पूर्ण करशीलच बाकी राहतील त्यासाठी आम्ही आहोतच I love you So मच… वाढदिवसाच्या परत एकदा खुप खुप शुभेच्छा. अश्या शब्दात तिने भावाचं कौतुक केलं आहे.तर या व्हिडिओत देखील तिचे आई बाबा देखील आंनदी पाहायला मिळतात.तर तिच्या या व्हिडिओवर देखील अनेकांनी तिच्यासोबत तिच्या भावाचं देखील कौतुक केलं.
स्नेहल शिदम ही तिच्या विनोदी कौशल्याने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवते,यासोबत तिने मालिकांसोबत बांबू,बॉईज ३ अश्या काही चित्रपटात देखील महत्त्वपूर्व भूमिकेला साकारल्यात.नुकतंच मध्येच व्हायरल होत असलेल्या स्नेहल आणि निखिल बनेच्या फोटोंमुळे त्यांच्या अफेरच्या चर्चांना देखील उधाण आलं होतं.(snehal shidam)
