बॉलिवूडमध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित ही देशातील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचे चाहते देखील मोठ्या प्रमाणात आहे तसेच माधुरी दीक्षितला बॉलिवूडची धक धक गर्ल म्हंटले जाते तिच्याबद्दल काही बोलेलं तिच्या चाहत्यांना मुळीच आवडतं नाही. त्यामुळे तिचा अपमान केल्यानं नेटफ्लिक्सला नोटिस पाठवण्यात आली आहे. बिग बँग थिअरी शोच्या दुसऱ्या सीझनच्या पहिल्याच भागात शेल्डन कूपरची भूमिका करणाऱ्या जिम पार्सन्सने ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षित यांच्या एका सीनची तुलना केली आहे. नक्की काय आहे हे संपूर्ण प्रकरण ते जाणून घेऊया.(Big Bang Theory deleted scene)

तसेच लेखक आणि राजकीय विश्लेषक मिथुन विजय कुमार यांनी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स ला कायदेशीर नोटीस बजावली आहे नेटफ्लिक्सची प्रसिद्ध सीरिज ‘बिग बँग थिअरी’ मधील एक भाग काढून टाकण्यासंदर्भात ही नोटीस पाठवण्यात आली आहे. तो संपूर्ण एपिसोड माधुरी दीक्षितशी संबंधित असल्याचे कुमार यांनी पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे. त्यांनी हा एपिसोड अपमानास्पद असल्याचं त्यांच्या तक्रारीत म्हटलं आहे.
हे देखील वाचा- म्हणून मिस वर्ल्ड ऐश्वर्या रायला ओरडले होते ऋषी कपूर…साधेपणानं राहणं ठरलं होत कारण
यानंतर या शोमधील प्रसिद्ध असलेला अभिनेता राज कूथरापल्ली या व्यक्तिरेखेने माधुरी दीक्षितबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले तसेच राजची भूमिका साकारणाऱ्या कुणाल नायर यांनी या एपिसोडमध्ये माधुरी दीक्षित वर टीका केल्याचे दिसून येते मिथुन विजय कुमार यांनी हा शो माधुरीचा अपमान करण्यात आल्याचे सांगत असून नेटफ्लिक्स सारख्या कंपन्यांनी त्यांची जबाबदारी नीट समजून घेतली पाहिजे की ते काय दाखवत आहेत त्यामुळे हे व्यासपीठ सामाजिक मूल्ये आणि समाजाच्या भावनांबाबत संवेदनशील असले पाहिजे.

त्यामुळे नेटफ्लिक्सला याबाबत नोटीस बजावली गेली आहे. नोटीसमध्ये, उर्वरित ओटीटी प्लॅटफॉर्मसाठीही काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत .तसेच नेटफ्लिक्सच्या या सीनबद्दल बोलताना मिथुन विजय कुमार म्हणाले नोटीसला जर प्रतिसाद मिळाला नाही तर ते पुढील कायदेशीर कारवाई करतील. तसेच त्यांच्या साइटवर अपमानास्पद आणि भेदभाव करणारा कन्टेट न देणे ही त्यांची जबाबदारी आहे. असे देखील त्यांनी म्हंटले आहे.(Big Bang Theory deleted scene)