सोशल मीडियावर सध्या कंटेट क्रिएटर्सची चांगलीच चलती आहे. सोशल मीडियावर अनेक कंटेंट क्रिएटर्सनी आपल्यातल्या वेगळ्या कौशल्याने नेटकऱ्यांसह अनेक सेलिब्रिटींचीही मनं जिंकली आहेत. सोशल मीडियावर असे अनेक कंटेट क्रिएटर्स आहेत, जे अनेक विनोदी व्हिडीओद्वारे नेटकऱ्यांचे मनोरंजन करतात. या कंटेट क्रिएटर्सचा सोशल मीडियावर चांगलाच चाहतावर्गदेखील आहे. यापैकीच एक म्हणजे अथर्व रुके. अथर्वने त्याच्या आगळ्या-वेगळ्या कंटेटने सोशल मीडियावर त्याचा दबदबा निर्माण केला आहे.
अथर्व रुकेचे सोशल मीडियावर पाच लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर अथर्व अनेक पद्धतीच्या व्यक्तिरेखा चाहत्यांसमोर आणत प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. त्याच्या अनेक रील्सना लाखांहून अधिक व्ह्यूजही मिळाले आहेत. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळीही त्याच्या व्हिडीओला पसंती दर्शवतात. अशातच अथर्वचे व्हिडीओ पाहून एका मोठ्या सेलिब्रिटीने त्याचे कौतुक केले आहे.

अथर्व हा सोशल मीडियावर सध्या बऱ्यापैकी चर्चेत असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक रील्स व्हिडीओ शेअर करत त्याच्या चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. अशातच त्याने शेअर केलेली एक स्टोरी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अथर्वला ‘बिग बॉस १६’ पर्वाचा विजेता व प्रसिद्ध रॅपर एम. सी स्टॅनने मॅसेज करत त्याचे कौतुक केले आहे आणि याचा स्क्रीनशॉट अथर्वने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे शेअर केला आहे.
अथर्वचे ‘खाला’ या अनोख्या व्यक्तिरेखेमध्ये साकारलेले अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत आणि एम. सी. स्टॅनलादेखील त्याच्या या ‘खाला चाची’ व्यक्तिरेखेची भलतीच भुरळ पडली आहे. याचेच कौतुक करत एम. सी. स्टॅनने अथर्वला “खालाचे व्हिडीओ भारी करत आहेस. देव तुला आशीर्वाद देवो” असं म्हटलं आहे. यावर अथर्वनेदेखील “त्याला खूप खूप धन्यवाद भाऊ” असं उत्तर दिलं आहे आणि याचाच स्क्रीनशॉट अथर्वने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.
दरम्यान, अथर्व हा सध्याच्या काही आघाडीच्या कंटेट क्रिएटर्सपैकी एक आहे. त्याच्या ‘विचित्र काका’, ‘भाव करणारी बाई’, ‘खाला चाची’, ‘नाजुक Guy’, ‘डॉन आंटी’, ‘शो ऑफ करणाऱ्या काकू’ यांसह अनेक व्यक्तिरेखांना नेटकऱ्यांकडून तूफान प्रतिसाद मिळत आहे.