सुख म्हणजे काय असतं ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते.या मालिकेच्या कथानकासोबत या मालिकेतील सर्वच कलाकार हे नेहमी चर्चेत असतात. या मालिकेतील जयदीप गौरी यांची जोडी तर चाहत्यांची लोकप्रिय जोडी आहे, यासोबतच या मालिकेतील खलनायिका शालिनीला देखील चाहत्यांची पसंती मिळते.ही शालिनीची भूमिका अभिनेत्री माधवी निमकर साकारताना दिसते.या मालिकेत शालिनी ही नकारात्मक भूमिका साकारुनही माधवीने लोकप्रियता मिळवली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर ती कायम चर्चेत असते.कलाविश्वात सक्रीय असलेली माधवी सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे अनेकदा ती तिचे ग्लॅमरस फोटो ,कुटुंबासोबतचे काही खास क्षण तसेच तिचे काही व्हिडीओ शेअर करत असते. नुकतंच माधवीने सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला. या व्हिडिओत गोडाचं नैवेद्य बनवताना दिसते.(Maadhavi Nemkar)

माधवीने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.या व्हिडिओत ती गुढीपाढव्यानिमित्त पुरणपोळी बनवताना दिसते.माधवी ही नेहमी तिच्या बिझी शेड्युल मधून नेहमी टाइम काढत कुटुंबाला वेळ देत असते. अश्यातच तिने काल गुढीपाडव्यानिमित्त ती घरी पुरणपोळी बनवत आहे. व्हिडिओत तिने चमचमीत तुपाची बनवलेली पुरणपोळी पाहायला मिळते. हा व्हिडीओ शेअर करत,गुढी पाडाव्यानिमित्त गोडाचा नैवेद्य पुरणपोळी ( मला खूप चांगल्या जमतं असं नाही.नेहमी प्रयत्न करते हा नवीन वर्ष तुम्हाला असा मधुर जावो असं म्हणत तिने शुभेच्छा दिल्यात. तर तिचा हा व्हिडीओ चाहत्यांना आवडल्या असून चाहत्यांनी या व्हिडिओवर खूप छान तसेच इमोजी देत पसंती दिली.(Maadhavi Nemkar)
====
आणखी वाचा-आई आणि लेक होणार का एकाच घरच्या सुना?
====
माधवी निमकर ही तिच्या लूकमुळे नेहमी चर्चेत येते. सतत ती तिच्या साडीतील काही फोटो शेअर करते. तिच्या या सर्वच फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते. माधवी ही मराठी कलाविश्वात एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्यात.यासोबतच तिचा सोशल मीडियावर देखील मोठा चाहता वर्ग असलेला पाहायला मिळतोय.(maadhavi nemkar)