सिनेसृष्टीत नेहमीच एका सेलिब्रिटी कपलची चर्चा सुरु असते. ही जोडी म्हणजे अभिनेत्री अमृता देशमुख व अभिनेता प्रसाद जवादे. काही महिन्यांपूर्वी ही जोडी लग्नबंधनात अडकली. अमृता व प्रसादच्या लग्नाचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना पाहायला मिळाले. ‘बिग बॉस’ मराठीमुळे अमृता व प्रसाद यांच्यातील मैत्री वाढत गेली आणि त्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. लग्नाआधी अनेक दिवसांपासून या जोडीच्या अफेअरच्या चर्चा सुरु होत्या. मात्र दोघांनीही अधिकृतरीत्या काहीच घोषित केलं नव्हतं. (Amruta Deshmukh And Krutika deo)
अमृता व प्रसाद यांनी थेट त्यांच्या साखरपुड्याचे फोटो शेअर करत प्रेमाची जाहीर कबुली दिली. त्यानंतर दोघांचा शाही विवाहसोहळा संपन्न झाला. जवळचे नातेवाईक, कलाकार, कुटुंबियांच्या उपस्थितीत हा सोहळा अगदी दणक्यात पार पडला. अमृता व प्रसादच्या लग्नाची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. अमृताच्या लग्नात तिचा भाऊ अभिनेता अभिषेक देशमुख व वहिनी अभिनेत्री कृतिका देव यांचीही चर्चा रंगली. अभिषेक व कृतिकाने मिळून प्रसाद व अमृताच्या केळवणाचा थाटही घातला होता.
आता लग्नांनंतर अमृता तिच्या भावाकडे आली आहे. यावेळी अमृताच्या वहिनीने म्हणजेच कृतिकाने तिच्यासाठी खास बेत केलेला पाहायला मिळत आहे. अमृता ही खानदेशातील आहे. कृतिकाने अमृतासाठी खास खानदेशी पद्धतीच्या जेवणाचा घाट घातलेला पाहायला मिळत आहे. भरीत भाकरीचा हा घाट घातल्यानंतर कृतिका लाजताना दिसत आहे. “खानदेशी भरीत भाकरी बनवल्यानंतर माझी वहिनी लाजत आहे”, असं कॅप्शन देत अमृताने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अमृता कृतिका ऑफिशिअली खानदेशी झाली असल्याचं म्हणत आहे.
अभिनेत्री कृतिका देव ही अभिषेकसह विवाहबंधनात अडकली आहे. कृतिका काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘ताली’ या वेबसीरिजमधील तिच्या भूमिकेमुळे चर्चेत आली. तर अभिषेक सध्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहे. तर अमृता सध्या रंगभूमीकडे वळली आहे, ‘नियम व अटी लागू’ या तिच्या नाटकाचे सध्या दौरे सुरु असलेले पाहायला मिळत आहेत.