वयाची पन्नाशी उलटून गेली तरी अतिशय निरागस, मनमोहक, लाघवी दिसणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर. ऐश्वर्या नारकर नेहमीच तिच्या अदाकारांनी चाहत्यांच्या विशेष पसंतीस पडते. वेगवेगळ्या फोटोशूटमुळे ऐश्वर्या नेहमीच चर्चेत असते. सध्या लूकमध्ये आपल्या निरागसतेने ती नेहमीच प्रेक्षकांना भुरळ घालत असते.(aishwarya narkar photoshoot)
पहा ऐश्वर्या नारकरच्या हटके अंदाजातील फोटोशूट (aishwarya narkar photoshoot)

वयाची पन्नाशी पार केली असली तरी ऐश्वर्या अजूनही बोल्ड अँड ग्लॅमरस दिसते. नुकतंच तिच्या एका मादक फोटोशूटने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलंय.

ऐश्वर्या तिचे ग्लॅमरस आणि सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. बरेचदा ती वेस्टर्न आऊटफिट घातलेल्या कपड्यांमध्ये फोटो शेअर करते पण ऐश्वर्याला साडी मध्ये पाहणं रंजक ठरत. ऐश्वर्याने लाल साडीतील काही फोटो शेअर केले आहेत.

या लाल रंगाच्या साडीमध्ये ऐश्वर्या अधिकच सुंदर दिसतेय. पाण्यात भिजलेले आणि ओलेचिंब झालेले फोटोही ऐश्वर्याचा ऐश्वर्य अधिक देखणं करतायत.

या लाल रंगाच्या साडीसह कलरफुल असा डिझाईन केलेला ब्लाउज परफेक्ट मॅच झालेला आहे. कपाळावरच्या नाजूक टिकलीने आणि नो मेकअप लूकने तिचे सौंदर्य खुलून दिसतंय.

ऐश्वर्याचा सोशल मीडियावरही खूप मोठा चाहता वर्ग आहे. तिच्या फोटो आणि व्हिडिओलाही चाहते भरभरून प्रतिसाद देत असतात.(aishwarya narkar photoshoot)

ऐश्वर्याच्या या फोटोंवरील एका कमेंटने लक्ष वेधून घेतलय. ‘भीगा बदन जलने लगा और अविनाश भाऊ पिघलने लगा’ असे म्हणत नेटकऱ्याने कमेंट केली आहे. ऐश्वर्याचे पती अविनाश नारकर यांना उद्देशून ही कमेंट करण्यात आली आहे.

ऐश्वर्याने बऱ्याच चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. निखळ हास्य आणि मनमोहक अदांमुळे ऐश्वर्या कायमच चाहत्यांच्या मनावर राज्य करत असते.
