मराठी सिनेसृष्टीतील ‘बिग बॉस’ हा वादग्रस्त शो कायमच चर्चेत राहिला. ‘बिग बॉस’ मराठीमुळे अनेक कलाकारांना उत्तम असा प्लॅटफॉर्म मिळालेला पाहायला मिळाला. या ‘बिग बॉस’मराठीमधील प्रत्येक पर्व विशेष गाजलं. या पर्वातील सिझन एकमधील स्पर्धकांची विशेष चर्चा रंगलेली नेहमीच पाहायला मिळाली. ‘बिग बॉस’च्या या पहिल्या पर्वाच्या विजेतेपदावर मेघा धाडेने नाव कोरले. या सीझनमधील आणखी नेहमीच चर्चेत राहिलेली गोष्ट म्हणजे मेघा धाडे, सई लोकूर, शर्मिष्ठा राऊत यांची मैत्री. (Sai Lokur And Megha Dhade Troll)
‘बिग बॉस’ मराठीच्या पहिल्या सिझनमधील मेघा, सई, शर्मिष्ठा यांची मैत्री विशेष चर्चेत राहिली. अशातच या तीन मैत्रिणींचा एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. मेघाच्या आलिशान अशा व्हिलावर एन्जॉय करतानाचा खास व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. रत्नागिरी येथे असलेल्या मेघाच्या या आलिशान व्हिलावर सई लोकूर व शर्मिष्ठा राऊत आपल्या पतीसह सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी गेल्या होत्या. तेथील त्यांचे अनेक फोटो व व्हिडीओ तुफान व्हायरल झाले आहेत.
मेघाच्या व्हिलामधील झोक्यावर झुला घेताना या तीन मैत्रिणींचा एक व्हिडीओ सईने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून अभिनेत्रींना अनेकांनी त्यांच्या वजनावरुन ट्रोल केलेलं पाहायला मिळत आहे. वजनावरून ट्रोल करताच मेघाने या नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर देत त्यांची बोलतीच बंद केली आहे.

या व्हिडीओवर कमेंट करत एका नेटकऱ्याने लिहिलं आहे की, “झोका तुटेल. तीन हत्ती”, असं म्हटलं आहे. या नेटकऱ्याला उत्तर देत मेघा म्हणाली, “झोक्याची काळजी करु नकोस स्वतःची कर. उगाच समोर आलास तर पायाखाली चिरडला जाशील म्हणून म्हटलं उंदरा”. तर आणखी एकाने, “काय खाऊन एवढा जाड्या झालात सई आणि मेघा”, असं म्हणताच मेघाने उत्तर देत म्हटलं की, “काय खाऊन ते माहित नाही. पण तुझ्या पिताश्रींचं नक्कीच नाही”. तर आणखी एका युजरने “तुटेल ते”, अशी कमेंट केली आहे. यावर उत्तर देत मेघा म्हणाली, “काळजी करु नकोस झुला व आमची मैत्री मजबूत आहे. कधीच तुटणार नाही”, असं म्हटलं आहे.