Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate : मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे यांचा शाही विवाहसोहळा उरकल्यानंतर दोघंही विशेष चर्चेत आलेले पाहायला मिळाले. ‘आमचं ठरलं’ म्हणत सोशल मीडियावरुन जाहीर प्रेमाची कबुली देत या जोडीने प्रेक्षकांना सुखद धक्का दिला. त्यानंतर या जोडीने पारंपरिक अंदाजात त्यांचा शाही विवाहसोहळा उरकला. दोघांच्या लग्नसोहळ्याच्या फोटोंनी सोशल मिडियावर चांगलाच धुमाकूळ घातला होता. कलाक्षेत्रातील कलाकारांच्या उपस्थितीत डेस्टिनेशन वेडिंग सोहळा अगदी थाटामाटात उरकण्यात आला. त्यानंतर मुग्धा व प्रथमेश त्यांच्या लग्नानंतरचे दिवस एन्जॉय करताना दिसले
मुग्धा व प्रथमेश लग्नानंतर वा लग्नाआधीपासूनच सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय होते. नेहमीच ते काही ना काही शेअर करत असतात. हल्ली ते एकमेकांसाठी स्टोरीही शेअर करत असतात. लग्नानंतर दोघेही जोमाने कामाला लागले आहेत. कधी एकत्र गायनाचे शो घेत तर कधी वेगवेगळ्या ठिकाणी दोघेही गायनाचे कार्यक्रम घेताना दिसत आहेत. दोघांची केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांनादेखील चांगलीच भावत आहे. काही दिवसांपूर्वी मुग्धा गायनाच्या कार्यक्रमासाठी अंदमान येथे गेली होती.

आता अंदमान दौरा करुन आल्यानंतर मुग्धा व प्रथमेशच्या सोशल मीडियावरील स्टोरीने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मुग्धा व प्रथमेश आता आरवली येथे गेले असल्याचं त्यांच्या या स्टोरीवरुन कळत आहे. “थंडीतील अशी ही सकाळची रम्य पहाट” असं कॅप्शन देत प्रथमेशने त्यांच्या गावच्या निसर्गरम्य वातावरणाचा व्हिडीओ शेअर केला आहे. तर गावच्या घराचा फोटोही त्याने यावेळी शेअर केला आहे. एकूणच लग्नानंतर पुन्हा एकदा प्रथमेश व मुग्धा त्यांच्या गावच्या घरी गेले असल्याचं समोर आलं आहे.

लग्नानंतरचे दिवस मुग्धा व प्रथमेश एन्जॉय करताना दिसत आहेत. मुग्धा व प्रथमेश यांचा लग्नानंतर सुखाचा संसार सुरळीत पाहणं रंजक ठरत आहे. लग्नानंतरही मुग्धा व प्रथमेश त्यांच्या गावच्या घरी गेले होते. गावच्या घरी दत्तजयंती निमित्त कार्यक्रम करतानाही ते दिसले. यावेळी दोघेही लग्नानंतर पहिल्यांदा एकत्र गायले होते. त्यानंतर दोघंही त्यांच्या कामाला लागले आहेत.