Poonam Pandey Died at 32 : अभिनेत्री पूनम पांडेच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर लगेचच दुसऱ्याच दिवशी अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत स्वतः जिवंत असल्याचा खुलासा केला. त्याच्या मृत्यूची बातमी हा एका हेतूने हा स्टंट केला असल्याचं समोर आलं. या अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ जारी करुन महिलांना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाबाबत जागरुक करण्यासाठी हे सर्व नाटक केल्याचा खुलासा केला. आता पूनमच्या या कृतीमुळे लोक चांगलेच संतापले आहेत. दरम्यान अभिनेत्रीला जोरदार ट्रोलही करण्यात येत आहे.
सोशल मीडियावरील व्हिडीओमध्ये पूनम असं म्हणताना दिसत आहे की, “मला तुम्हाला सगळ्यांना हे सांगायचं आहे की, मी इथेच आहे. मी जिवंत आहे. गर्भाशयच्या मुखाचा कर्करोग मला झालेला नाही. पण या आजाराबाबत माहिती नसल्यामुळे आणि ज्ञानाच्या अभावामुळे आतापर्यंत हजारो महिलांनी त्यांचे प्राण गमावले आहेत. इतर कर्करोगांप्रमाणे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग टाळता येतो. या आजाराबाबत जनजागृती कशाप्रकारे करता येईल याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी बायोमधील लिंकला भेट द्या. या कर्करोगाचा अंत करण्यासाठी चला एकत्र येऊया” असं म्हणत अभिनेत्रीने पोस्ट शेअर केली आहे.
आता पूनम पांडेच्या या व्हिडीओबद्दल आणि तिच्या मृत्यूची खोटी बातमी पसरवल्याबद्दल सोशल मीडियावर प्रेक्षकांचा संताप पाहायला मिळत आहे. एका यूजरने लिहिले आहे की, “पुढच्यावेळी लोक तुम्हाला गांभीर्याने घेणार नाहीत, तुम्ही तुमची संपूर्ण विश्वासार्हता नष्ट केली आहे”, तर आणखी एका व्यक्तीने असे लिहिले आहे की, “ती जिवंत आहे याचा मला आनंद आहे, पण या नाटक व प्रसिद्धी स्टंटसाठी कृपया तिला अटक करा”. तर आणखी एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, “आतापर्यंतचा सर्वात वाईट पब्लिसिटी स्टंट”. तर आणखी एका व्यक्तीने कमेंट केली आहे की, “लज्जास्पद, आता प्रसिद्धीसाठी मृत्यूचे नाटक होणार. तुम्हाला अटक झाली पाहिजे”.

२ फेब्रुवारीला पूनम पांडेच्या सोशल मीडियावर एक पोस्ट करण्यात आली होती ज्यामध्ये अभिनेत्रीचा गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने मृत्यू झाल्याचे लिहिले होते. या बातमीनंतर टीव्ही इंडस्ट्रीला धक्का बसला. दरम्यान, पूनम पांडेने खुलासा केला आहे की, “गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाबाबत लोकांना जागरुक करण्यासाठी तिने ही खोटी बातमी पसरवली होती”.