मिसेस मुख्यमंत्री या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे अमृता धोंगडे. अमृता हिला कोल्हापूरची लवंगी मिरची या नावाने देखील ओळखलं आहे. अमृताने बिग बॉसच्या घरत आणि प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. ती बिग बोसच्या घरात तिच्या उत्कृष्ट खेळामुळे शेवटपर्यंतटिकून राहिली. तिने तिच्या जबरदस्त खेळाने सर्वांचं मन जिंकलं. आता अमृता तिच्या सोशल मीडियावर कमालीची सक्रिय दिसून येते. यासोबत ती चाहत्यांना तिच्या मनमोहक अंदाजात काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करते.नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. आणि हा व्हिडीओ पाहून तिचं लग्न ठरलं का? अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली.(Amruta Dhongade)
====
हे देखील वाचा – ‘यांत माझं कुठे काय आहे? मी इथे खुर्चीवर बसते आणि तू काय करतोस ते बघते आणि… “रंजना अशोक मामांना म्हणाल्या होत्या…”
====
अमृता ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असून तिने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ तिने तिच्या हाता पायावर मेहंदी काढलेली मिळते, या व्हिडिओत ती मेहंदी काढताना खूप आनंदी दिसून येते, तसेच तिचा हा आनंद पाहून तिचं लग्न ठरलं का अशी चर्चा सर्वत्र रंगली.तिचा हा व्हिडीओ पाहुन चाहत्यांनी तिच्या कॉमेंट्सचा वर्षाव केला. ओहो, शादी का मोहोल बॅन चुका है, निपटा देते है, लग्न करतेय का?, अमृता लग्न ठरलं की काय लग्नाला बोलावं, अश्या अनेक कॉमेंट केल्या आहेत. त्यामुळे अमृताचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. अमृता खरंच कधी लग्न करणार हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.(Amruta Dhongade)

अमृता धोंगडे ही मूळची कोल्हापूरची आहे. अमृताने याआधी झी मराठीवरील ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेत काम केलं आहे. यामध्ये तिने ‘सुमी’अर्थातच सुमनची भूमिका साकारली होती. मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेमुळे अमृता धोंगडे महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली. तर बिग बॉस मराठीमुळे ती प्रचंड चर्चेत आली होती. आता ती यानंतर कोणत्या शो मध्ये झळकणार हे बघणं महत्वाचं आहे.