घरात राहून फक्त घर सांभाळणं हा स्त्रियांबाबत चालत आलेला कथित बोध नाहीसा करत नारीशक्तीचं महत्व समस्त जग ओळखून आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आजची स्त्री या समाजकल्याण्यात मोलाचं योगदान देत आहे. परंतु समाजातील काही भागात अजूनही नारीशक्तीच्या जाणिवेची गरज दिसून येते. त्यासाठी प्रोत्सहन देणारे अनेक चित्रपट निर्माण करण्यात आले या चित्रपटांमधील काही गाजलेल्या चित्रपटांबद्दल जाणून घेऊयात.(womens day 2023)
महिलांचा सन्मान करणारे चित्रपट(womens day 2023)
१) मी सिंधुताई सपकाळ
माई म्हणून सर्वांच्या मनात ममतेच अढळ स्थान असलेल्या सिंधुताई सपकाळ यांच्या आयुष्यावर एक चित्रपट बनवण्यात आला. या चित्रपटाचे लेखन दिगदर्शन अनंत महादेवन आणि संजय पवार यांनी केले असून सिंधुताई यांची भूमिका अभिनेत्री तेजस्विनी पंडित ने साकारली आहे.
२) पोश्टर गर्ल
स्त्रीच महत्त्व किती आणि का आहे या गोष्टीचा उत्तम नमुना म्हणजे लेखक दिगदर्शक हेमेण्ड ढोमे यांनी लिहिलेली ‘पोश्टर गर्ल’ ही कथा. समीर पाटील यांनी हि कथा दिगदर्शित केली असून स्त्री आयुष्यात कसा अमूलाग्र बदल घडवू शकते हे दाखवणारी ही कथा प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती.
या चित्रपटातील मुख्य भूमिका अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने साकारली असून हेमंत ढोमे, जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव, संदीप पथक, असे अन्य कलाकार मंडळीही या चित्रपटात दिसतात.
इतिहासात अजरामर झालेली ‘हिरकणी’(womens day 2023)
३)हिरकणी
एक आई किती कणखर असू शकते किती मायाळू असू शकते याचं मुर्तिमंद उदाहरण म्हणजे इतिहासात अजरामर झालेली ‘हिरकणी’. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापण केलेल्या स्वराज्यात एक अशी आई होऊन गेली जी आपल्या लहान लेकरासाठी जीवाची ही पर्वा न करता एक कढा उतरून गेली होती.
याच आईची कथा मांडणार’ हिरकणी’ हा चित्रपट काही वर्षांपूर्वी दिगदर्शित करण्यात आला होता. ज्या मध्ये हिरकणी ही मुख्य भूमिका अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ने पार पाडली असून चित्रपटाचे दिगदर्शन अभिनेता दिगदर्शक प्रसाद ओक यांनी केले होते.
४)आनंदी गोपाळ
भारतातील पाहल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या जीवनावर आनंदी गोपाळ हा चित्रपट बनवण्यात आला. लहानपन ने डॉक्टर बनण्या पर्यंतचा त्यांचा संघर्ष या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात आनंदी गोपाळ यांची भूमिका अभिनेत्री भाग्यश्री मिलिंद ने साकारली असून अभिनेता ललित प्रभाकर देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसला होता.
५)झिम्मा
स्त्री ने कधी ही काळाच्या मागे न राहत कलसोट राहावं, संसार सांभाळता सांभाळता स्वतःच्या इच्छा आकांक्षा ही पूर्ण करत स्त्री ला जगता यावं यासाठी प्रेरित करणारा ‘ झिम्मा ‘ हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या मनाला चांगलाच भावला होता. हेमंत ढोमे यांनी या चित्रपटाचं दिगदर्शन केलं होत. वेगवेगळ्या समाजातील महिला लंडन येथे एकत्र येऊन एकमेकींचा अनुभव शेअर करत कशा राहतात या संबंधित हे कथानक आहे.(womens day 2023)