‘बिग बॉस १४’ची विजेती रुबिना दिलैक व अभिनव शुक्ला यांनी त्यांच्या आयुष्याचा नवा टप्पा सुरु केला आहे. रुबिना आई झाल्याची गोड बातमी त्यांनी एका महिन्यांपूर्वी चाहत्यांसह शेअर केली होती. यानंतर आता रुबिनाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या जुळ्या मुलांचे पहिले फोटो शेअर केले आहेत. रुबिनाने गेल्या महिन्यात तिचा पती अभिनव शुक्लासह तिच्या चिमुकल्यांचे स्वागत केले. यानंतर आता अभिनेत्रीने तिच्या गोड बाळांची चाहत्यांसह ओळख करून दिली आहे. (Rubina Dilaik Baby Name)
रुबिना व अभिनवने त्यांच्या मुलींची ओळख करून देण्याबरोबरच त्यांनी दोघींच्या नावांचाही खुलासा केला आहे. जीवा व एधा अशी हटके व आशयघन नाव त्यांनी ठेवली आहेत. सोशल मीडियावर त्यांनी फोटो शेअर करत लिहिले आहे की, “आमच्या मुली, जीवा व एधा आज एक महिन्याच्या झाल्या आहेत हे सांगताना मला अत्यंत आनंद होत आहे. गुरुपूरबच्या शुभ दिवशी देवानेच आम्हाला हा आशीर्वाद दिला. आमच्या या गोड मुलींवर तुमचेही आशीर्वाद येऊद्या” असं कॅप्शन देत पोस्ट शेअर केली आहे.
गेल्या महिन्यात अभिनेत्रीने तिला जुळ्या बाळांची अपेक्षा आहे असं म्हटलं होत. यात बोलताना रुबिना म्हणाली, “डॉक्टरांनी आम्हाला सुरुवातीला सांगितलं होत की सुरुवातीचे बारा आठवडे थोडे अवघड आहेत. त्यामुळे ३ महिने कुणाला सांगू नका. मी कुणालाही सांगितलं नव्हतं. जेव्हा अभिनवला याबद्दल मी सांगितलं तेव्हा तो आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, नाही. यावर मी म्हणाले, ‘हो’. आम्हाला काहीच सुचत नव्हतं. आम्ही संपूर्ण प्रवासात एकमेकांशी काहीही बोललो नाही” असंही ती म्हणाली.
अभिनवच्या प्रतिक्रियेबाबत बोलताना रुबिना म्हणाली, “जेव्हा आम्ही तीन महिन्यांचा स्कॅन करून परत येत होतो तेव्हा आमच्या गाडीचा अपघात झाला होता. मागून आमच्या गाडीला दुसऱ्या गाडीने धडक दिली होती. तेव्हा मी खूप घाबरले होते. माझ्या बाळाला काही झाले तर नसेल ना याची मला चिंता वाटत होती. त्यामुळे आम्ही सुरुवातीला कुणालाही सांगितलं नव्हतं” असंही अभिनेत्रीने खुलासा करत सांगितलं होतं. रुबिना व अभिनव महिनाभरापूर्वी आई-वडील झाले आहेत ही गोष्ट स्वतः अभिनेत्रीच्या ट्रेनरने शेअर केली होती. अभिनेत्रीच्या ट्रेनरने एक पोस्ट शेअर केली होती मात्र नंतर तिने ती पोस्ट डिलीट केली आहे. त्यानंतर चाहते रुबिनावर शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसले.