बिग बॉस १६ चे पर्व प्रचंड गाजले. या पर्वातील सगळ्याच कलाकारांनी अगदी कल्ला केलेला पाहायला मिळाला. बिग बॉस च्या या पर्वाचा विजेता पुण्याचा रॅपर एमसी स्टॅन ठरला. तर या पर्वाचा उपविजेता शिव ठाकरे ठरला. शिव आणि एमसी स्टॅनची या सीजन मधील जोडी ही चांगलीच चर्चेत राहिली. एमसी स्टॅन ने सिनेविश्वात स्वतःची जागा स्वतःच निर्माण केली. (mc stan shahrukh khan)
हिंदी बिग बॉसमुळे एमसी स्टॅनला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. खरं तर त्याच्या चाहत्यांमुळेच तो ट्रॉफी जिंकू शकला. शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन त्यांच्यापैकीच कोणाला तरी ट्रॉफी मिळणार हे दरम्यान अंदाजावरून वर्तविण्यात येत होत तर या ट्रॉफीचा मानकरी हा एमसी स्टॅन ठरला. सोशल मीडियावरही एमसी स्टॅनचा स्वतःचा असा वेगळा चाहतावर्ग आहे त्यामुळे सोशल मीडियावर ही त्याची क्रेझ पाहायला मिळतेय.
पहा एमसी स्टॅन कोणत्या चित्रपटात दिसणार (mc stan shahrukh khan)
बिग बॉस ची ट्रॉफी एमसी स्टॅनच्या नावावर झाल्यावर तो भलताच चर्चेत आला. एमसी स्टॅनला अनेक मोठमोठ्या ब्रॅण्डकडून जाहिरातींच्या ऑफरही आल्या आहेत. तर बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक साजिद वाजिद यांनी त्याला एका चित्रपटातील गाणंही ऑफर केल्याची चर्चा आहे. त्यांचे एकत्र फोटो व्हायरल झाल्यानंतर तर या चर्चांना आणखी उधाण आलं. (mc stan shahrukh khan)

आता मात्र एमसी स्टॅनच्या बॉलिवूड पदार्पणाची चर्चा सोशल मीडियावर रंगताना दिसतेय. बॉलिवूड किंग शाहरुख खानच्या चित्रपटातून स्टॅन बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे.(mc stan shahrukh khan)
====
हे देखील वाचा – मल्टीटॅलेंटेड भाऊ! अभिनय, गायन, आणि आता भाऊंच्या वादनाच्या कलेचं कौतुक
====
एका फॅन पेजवरुन करण्यात आलेल्या ट्वीटमुळे स्टॅन बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. जवानच्या निर्मात्यांनी चित्रपटासाठी स्टॅनशी संपर्क साधला असल्याचं या ट्वीटमध्ये म्हटलं गेलं आहे. परंतु, याबाबत चित्रपटाच्या टीमकडून अजून कोणतीही ऑफिशिअल माहिती देण्यात आलेली नाही.
एमसी स्टॅनच्या बॉलिवूड पदार्पणाच्या चर्चांमुळे त्याचे चाहतेही आनंदी आहेत. एमसी स्टॅन चे काही बॉलीवूड मधील कलाकारांपेक्षा ही इंस्टाग्रामवर अधिक फॉलोवर्स आहेत. एमसी स्टॅन त्याच्या चाहत्यांसाठी खास भारत दौरा करणार असल्याचे त्याने सोशल मीडियावरून सांगितले. यामध्ये देशातील विविध शहरात त्याचे कॉन्सर्ट होणार आहेत.