महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता असून इतर निर्णयाप्रमाणेच या दोन्ही मंत्र्यांनी महाराष्ट्रातील चित्रपट सृष्टीसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. चित्रपट सृष्टीच्या भल्यासाठी आणि चित्रपट सृष्टीला चालना मिळावी या दृष्टिकोनातून त्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक केलं जात आहे.(Movies on Chhatrapati Shivaji maharaj)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयानुसार, मराठी सिनेमांना तीन महिन्यात शासकीय अनुदान मिळणार असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित अनेक सिनेमे मराठी इंडस्ट्रीत निर्माण होत आहेत. या सिनेमांसाठी आणि याचसोबत अन्य विषयांवरील प्रोत्साहित करणाऱ्या सिनेमांसाठी सरकार १ कोटीचे अनुदान देणार आहे.
सद्यकाळात अनेक मराठी सिनेमे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःचं नाव करताना दिसतायत. या सिनेमांना दुप्पट शासकीय अनुदान देण्याचा निर्णय शिंदे – फडणवीस सरकारने घेतला आहे. याशिवाय महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाने ‘फिल्म बाजार’ ही ऑनलाईन वेबसाईट तयार करण्याची घोषणा केली आहे.या वेबसाईटच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये स्वप्नील जोशी, महेश कोठारे, संजय जाधव असे अनेक मराठी कलाकार सहभागी असतील असे सांगितले आहे.
वाचा नक्की काय आहे योजना (Movies on Chhatrapati Shivaji maharaj)
परंतु अनुदान सरसकट सगळ्याच चित्रपटांना मिळतं की काही मोजक्यांनाच तिचा लाभ होतो? काय आहे नेमकं प्रकरण? याची अद्याप कल्पना नसून, या आधी सुद्धा सरकारमध्ये असलेल्या नेत्यांनी अशी घोषणा केली आहे. परंतु पुढे जाऊन त्या योजनेतून कोणाला किती लाभ झालाय यावर जास्त कोणी भाष्य करत नाही. “अनुदान योजना” हे एक मोठं जाळं असलं तरी आता मराठी सिनेमांसाठी अनुदान योजनेचे वचन सरकार कडून पाळलं जाईल का? हे पाहणं महत्वाचं ठरेल.(Movies on Chhatrapati Shivaji maharaj)

फिल्मबाजार या वेबसाईटसाठी दूरदर्शनवरील विविध वाहन्यांवरील मराठी मालिका, तसेच ओटीटीवरील मराठी चित्रपट आणि मालिका यांच्या निर्मितीकरिता पटकथा, लेखक, निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ आणि वित्त पुरवठादार करणार्यांना एका व्यासपीठावर आणून एकमेंकाशी बातचीत करणे, संपर्क साधणे, त्यांना नियमितपणे सल्ला देणे आणि बिगर आर्थिक साहाय्य, इत्यादी गोष्टींसाठी त्यांची मदत होणार आहे.