गेल्या काही महिन्यांपासून एक कलाक्षेत्रातील जोडी रिलेशनशिपमुळे विशेष चर्चेत आली होती. ही जोडी म्हणजे ‘सारेगमप लिटल चॅम्प्स’ फेम गायिका मुग्धा वैशंपायन व गायक प्रथमेश लघाटे. ‘आमचं ठरलं’ असं कॅप्शन देत मुग्धा व प्रथमेशने त्यांचा एकत्र फोटो शेअर नात्याची जाहीर कबुली दिली. तेव्हापासून या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. त्यानंतर मुग्धा व प्रथमेश यांचा विवाहसोहळ थाटामाटात पार पडला. दोन दिवसांपासून मुग्धा-प्रथमेशच्या लग्नाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. (Mugdha Vaishampayan Jewellery)
मुग्धा व प्रथमेश यांचा विवाहसोहळा कुटुंबीय, नातेवाईक व मित्रमंडळींच्या उपस्थितीत अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला. दोघांनी डेस्टिनेशन वेडिंग केलं. चिपळूण येथे या दोघांचा विवाह पार पडला. मुग्धा व प्रथमेशने अत्यंत साध्या पद्धतीने त्यांचा विवाहसोहळा उरकला. दोघांच्या लग्नातील अनेक फोटो, व्हिडीओ लक्षवेधी ठरत आहेत. दोघांच्या लग्नसोहळ्यातील लूकने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतले.
मुग्धा व प्रथमेश यांच्या लग्नसोहळ्यातील एक आकर्षणाची बाब म्हणजे मुग्धाचे दागिने. मुग्धाने तिच्या लग्नसाठी पारंपरिक दागिन्यांची निवड केली होती. पुण्यवचनावेळी केलेल्या लुकदरम्यान मुग्धाने घातलेल्या पारंपरिक पुतळी हाराने लक्ष वेधून घेतलं. तर नऊवारी साडीवर घातलेल्या पारंपरिक दागिन्यांनी व मुग्धाच्या मंगळसूत्राने लक्ष वेधून घेतलं. मुग्धाच्या व प्रथमेशच्या मोत्यांच्या मुंडावळ्या खास होत्या. हातात हिरवा चुडा भरलेल्या या नव्या नवरीचं लूक खुलून आलं होतं.
मुग्धा व प्रथमेशच्या लग्नाच्या लूकमधील त्यांच्या कपड्यांनीही लक्ष वेधून घेतलं होतं. प्रथमेशच्या लाल रंगाच्या कुर्त्याने व पुणेरी पगडीने लक्ष वेधून घेतलं होतं. हातात शेला घेत पोज देत प्रथमेशचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. मुग्धा व प्रथमेशची सुंदर रंगोळी देखील त्यांच्या लग्नासाठी काढण्यात आली होती. दोघांच्या फोटो, व्हिडीओवर सर्वच क्षेत्रातून व चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतं आहे.