बॉलिवूड सिनेसृष्टीतून एका प्रसिद्ध कॉमेडियनची आनंदाची बातमी समोर आली आहे. आई झाल्याचा आनंद या अभिनेत्रीने चाहत्यांसह शेअर केला आहे. प्रसिद्ध कॉमेडियन सुगंधा मिश्रा व डॉ. संकेत भोसले आई-बाबा झाले आहेत. पालक झाल्याचा आनंद या जोडप्याने त्यांच्या चाहत्यांसह शेअर केला आहे. ३५ वर्षीय सुगंधाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. सुगंधाचे पती डॉ. संकेत भोसले यांनी इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. (Sugandha Mishra Shared Goodnews)
डॉ.संकेत भोसले यांनी हॉस्पिटलमधील एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओद्वारे त्यांनी वडील झाल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. या व्हिडीओमध्ये संकेत खूप आनंदी दिसत आहेत. ते म्हणत आहेत की, “मी बाबा झालो आहे”. यानंतर, ते व्हिडीओमध्ये सुगंधाला ही दाखवत आहेत आणि म्हणत आहेत की, “ही आई झाली आहे”. त्यांनतर सुगंधा व संकेत व्हिडीओमधून त्यांच्या मुलीची झलक दाखवतात, मात्र त्यांनी त्यांच्या लेकीच्या चेहऱ्यावर हार्ट इमोजी लावून चेहरा लपवला आहे.
हा व्हिडीओ शेअर करत सुगंधाचे पती डॉ. संकेत भोसले यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “विश्वाने आमच्यासह चमत्कार करत आम्हाला आशीर्वाद दिला आहे. हा आशीर्वाद आमच्या प्रेमाचे प्रतीक आहे. या आशीर्वादरुपी आम्हाला सुंदर मुलगी झाली आहे. कृपया तुमचे प्रेम व आशीर्वाद देत राहा” असं त्याने म्हटलं आहे.
सुगंधा मिश्रा व डॉ. संकेत भोसले यांनी ऑक्टोबर महिन्यात घरी चिमुकला पाहुणा येणार असल्याचं सांगितलं होतं. तेव्हापासून, हे जोडपे या सुंदर क्षणांबाबत चाहत्यांसह काही ना काही शेअर करत होते. अलीकडेच या जोडप्याने मराठी रितीरिवाजानुसार डोहाळ जेवणाचाही कार्यक्रम पार पाडला. या सोहळ्याचे अनेक फोटो व व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावरून शेअर केले होते. लग्नाच्या जवळपास अडीच वर्षानंतर या जोडप्याने चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर केली.