मराठमोळी अभिनेत्री अनघा अतुल ही सध्या रंग माझा वेगळा या मालिकेत स्वेता हे नकारात्मक पात्र साकारत चाहत्यांचे मनोरंजन करते.(Anaghaa Atul hot photoshoot)

अनघा अतुल ही सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असल्याने सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग असलेला पाहायला मिळतो. सोशल मीडियावर ती तिच्या फोटो,व्हिडीओ सोबतच ती तिच्या नवीन प्रोजेक्ट्ची माहिती देखील देत असते.

नुकतंच तिने सोशल मीडियावर एक बोल्ड फोटोने चाहत्यांना घायाळ केलं. यात तिने बॅकलेस असा ग्रीन रंगाचा वनपीस घातलाय. या फोटोतील तिच्या पोजने तसेच तिच्या मोकळ्या केसांनी तिच्या या हॉटनेसमध्ये भर घातलीय.(Anaghaa Atul hot photoshoot)

It’s too hot ! oustside ! असं कॅप्शन तिने या फोटोला दिल. तिच्या या फोटोची भुरळ चाहत्यांना पडली असून चाहत्यांनी हॉट, तसेच फायर इमोजीचा वर्षाव तिच्या या फोटोवर केला.

याआधी देखील अनघाने अनेक बोल्ड फोटो शेअर केले आणि ते फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले.

याआधी अनघाने महेश कोठारे यांच्या ‘कोठारे व्हिजन’मध्ये ब्रँड मॅनेजर म्हणून काम केलं आहे. तसंच ऋतुजा बागवेची मुख्य भूमिका असलेल्या ‘अनन्या’ नाटकातही तिने अनन्याची मैत्रीण प्रियांकाची भूमिका साकारली होती.
