असं म्हणतात एखाद्या व्यक्तीचे सौंदर्य वयानुसार कमी होत जाते. परंतु काही जणांच्या वाढत्यावयानुसार त्यांचे सौंदर्य अजून बहरत जाते. मराठी चित्रपट सृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांच्या सौंदर्यात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. ऐश्वर्या त्यांच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देतात. ऐश्वर्या सोशल मीडियावर सुद्धा बऱ्याच सक्रिय असतात. बरेचदा ते काही ना काही पोस्ट करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. (Aishwarya Narkar Birthday Celebration)
ऐश्वर्या नारकर व अविनाश नारकर यांचे रील व्हिडीओ सोशल मीडियावरून चांगलेच व्हायरल होत असतात. दरम्यान अनेकजण त्यांच्या या व्हिडीओला पसंती दर्शवतात तर बरेचदा ते या व्हिडीओमुळे ट्रोलही होतात. मात्र ऐश्वर्या ट्रोलरला उत्तर देतानाही दिसतात. अशातच ऐश्वर्या यांनी सोशल मीडियावरून शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नुकताच ऐश्वर्या यांचा वाढदिवस झाला.
ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ऐश्वर्या या त्यांच्या सौंदर्यामुळे, अभिनय कौशल्यामुळे ओळखल्या जातात. शिवाय त्या प्राणीप्रेमीही आहेत. ऐश्वर्या यांच्या घरातही पाळीव प्राणी पाळला आहे. शिवाय सेटवर असणाऱ्या प्राण्यांचेही ते अनेक फोटो, व्हिडीओ वेळोवेळी शेअर करत असतात. अशातच अभिनेत्रीने तिच्या वाढदिवसानिमित्त एका खास ठिकाणी भेट दिली.
ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त पतीसह अपंग जनावरांसाठी निवारा असलेल्या ठिकाणी भेट दिली. त्यांनी या ठिकाणी फिरताना व्हिडीओ शेअर केला असून “धन्य वाटत. या ठिकाणाचं नाव पाणवठा आहे. हे ठिकाण अपंग जनावरांसाठी निवारा आहे. गणराज जैन आणि डॉ. अर्चना जैन अपंग प्राण्यांच्या पुनर्वसनासाठी अथक प्रयत्न करत आहेत. अपंग प्राण्यांचे जीवन सुधारण्याच्या नि:स्वार्थ हेतूने ते असाधारण काम करत आहेत” असं त्यांनी कॅप्शन देत लिहिलं आहे. त्यांच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत त्यांचं कौतुक केलं आहे.