Piyush Ranade and Suruchi Adarkar Wedding : सिनेसृष्टीत सध्या कलाकारांची लग्न चर्चेत आहेत. एकामागोमाग एक कलाकार लग्नबंधनात अडकत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच एका मराठमोळ्या कलाकारांनी गुपचूप विवाहसोहळा उरकल्याने साऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अभिनेत्री सुरुची अडारकर व अभिनेता पियुष रानडे यांनी लग्न केलं असल्याचं नुकतंच समोर आलं आहे. दोघांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले आहेत.
सुरुची व पियुष यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. दोघांनी त्यांच्या शाही लग्नसोहळ्याचे फोटोस सोशल मीडियावरून पोस्ट करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. सुरुची अडारकरचं हे पहिलं लग्न आहे तर पियुष रानडेचं हे तिसरं लग्न असल्याचं समोर आलं आहे. याआधीही पियुषची दोन्ही लग्न असफल ठरली आहेत.
२०१० साली पियुष अभिनेत्री शाल्मली टोळ्येसह लग्नबंधनात अडकला. त्यांचा संसार दीर्घकाळ टिकला नाही. २०१४ साली त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर २०१६मध्ये त्याने मयुरी वाघसह लगीनगाठ बांधली. मयुरीसह ही त्याने घटस्फोट घेतला. त्यानंतर आता पियुषने त्याचं तिसरं लग्न उरकलं आहे. अभिनेत्री सुरुची अडारकरबरोबर त्याने लग्न केले. तिसरं लग्न करताच पियुष विशेष चर्चेत आला आहे. आधीची दोन लग्न असफल ठरल्याने अभिनेत्याने तिसरं लग्न केलं असल्याने तो नेटकऱ्यांच्या कचाट्यात अडकला आहे.

सुरुची व पियुष यांनी त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर करत इंस्टाग्राम अकाऊंटवरून स्टोरी पोस्ट केली. या पोस्टवर अनेकांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. तर अनेकांनी त्यांना ट्रोल केलं आहे. एका नेटकऱ्याने, “अरे हा किती लग्न करणार?” अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्याने, “अरे पण दोन दोन लग्न मोडलेल्या मुलावर विश्वास ठेवून लग्न कशा करतात या मुली” असं म्हटलं आहे. तर सुरुचीला प्रश्न विचारत, “अगं तुला दुसरा कोणी भेटला नाही का लग्न करायला हाच भेटला तुला” अशी कमेंट केली आहे. तर आणखी एका युजरने, “काय पण याचे आधीच दोन लग्न झाले आहेत. काय मूर्खपणा आहे. दोन लग्न मोडल्यानंतर कोण विश्वास कसा ठेवू शकतं?” असं म्हटलं आहे. तर आणखी एका नेटकऱ्याने पियुषवर निशाणा साधत, “अरे हा किती वेळा लग्न करतो?” अशी कमेंट केली आहे.