मराठी माणसाच्या आवडी निवडीत एक आवड अशी आहे जी प्रत्येक मराठी माणसाच्या कुठे ना कुठे भाग बनते ती गोष्ट म्हणजे ‘नाटक’. मराठी रंगभूमीवर असाधारन असे एकापेक्षा एक नाटकाचे विषय मराठी कलाकारांनी आणले आहेत. मराठी रंगभूमी बहारदार करणाऱ्या कलाकारांच्या यादीत अनेक मान्यवरांची नावे घेतली जातात.(sankarshan karhade new drama)
हरवत चाललेला प्रेक्षक वर्ग पुन्हा एकदा रंगभूमीकडे परतत असल्याचा आनंद सर्व रंगभूमीकर्मियाना झाला आहे. नुकताच १२५०० प्रयोगांचा टप्पा गाठणारे नाट्यसम्राट प्रशांत दामले यांसारख्या अनेक मंडळींनी मराठी रंगभूमी सुदृढ बनवली.
सध्याच्या परिस्थतीत असाच अजून एक रंगभूमीवेडा कलाकार आहे तो म्हणजे अभिनेता संकर्षण कऱ्हाडे. मालिका, चित्रपट, नाटक अशा तिन्ही आघाड्यांवर आघाडीवर असणारा संकर्षण आता अजून एक नवीन नाटक घेऊन प्रेक्षकांच्या आहे. कुठलीही गोष्ट खरेदी करताना त्यावर टॅक्स प्रमाणेच लागू असतात नियम आणि अटी याच नियम आणि अटींवर ‘नियम व अटी लागू’ हे नव कोरं नाटक लिहिण्याची किमया संकर्षण ने केली आहे.
नक्की काय आहे नवीन नाटकाचा विषय(sankarshan karhade new drama)
संकर्षण ने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून या संदर्भात पोस्ट करत माहिती दिली आहे. दिगदर्शक चंद्रकांत कुलकर्णी या नाटकाचे दिगदर्शक असून लेखन स्वतः संकर्षण ने या नाटकाचे लेखन केले आहे. संकर्षण ने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून या संदर्भात पोस्ट करत माहिती दिली आहे.इंस्टाग्राम वर पोस्ट केलेल्या व्हिडीओच्या कॅप्शन मध्ये संकर्षण ने ‘येssssss नवं कोरं करकरीत भन्नाट नाटक! येतंय लवकरच… ????????????❤️ अजून माहिती सांगू? नाही सांगू शकत. कारण नियम व अटी लागू!’ असं लिहिलं आहे तर अजून माहिती साठी नाटकाचंच इंस्टाग्राम आलं आहे.(sankarshan karhade new drama)

प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेतून समीर या संकर्षण ने साकारलेल्या पात्राला चाहत्यांनी चांगलंच प्रेम दिलं. सोबतच संकर्षणच्या ‘तू म्हणशील तसं’ या नाटकाचे ही प्रयोग अगदी दणक्यात सुरु आहेत. रंगभूमीवर लागू होणाऱ्या ‘ नियम व अटींना’ प्रेक्षक कशी दाद देतील हे पाहणं रंजक ठरणार आहे.
====
हे देखील वाचा – रात्रीस खेळ चाले नंतर पुन्हा एकदा उडणार झोप!’चंद्रविलास’ वैभव मांगले दिसणार भयावह रूपात….
====