मराठी तसेच हिंदी चित्रपटांमध्ये वेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारून श्रेयस तळपदे याने प्रेक्षकांच्या मनावर त्याच्या अभिनयाची एक वेगळीच छाप सोडली. काही महिन्यांपूर्वी “माझी तुझी रेशीम गाठ” या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असून श्रेयसने या मालिकेमध्ये मुख्य भूमिका बजावली होती. प्रेक्षकांनी त्याच्या मालिकेला देखील खूप प्रेम दिले. मराठी, हिंदी मधील अनेक चित्रपटांमधून श्रेयस ने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. तसेच पुष्पा या बहुचर्चित चित्रपटही अभिनेता अल्लू अर्जुनला दिलेल्या आवाज देखील श्रेयसचाच होता त्याच्या या कामगिरीचं ही जगभर कौतुक झालं. आता श्रेयस एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे. श्रेयसने बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन हिची माफी मागितली आहे.(Shreyas Talpade kriti sanon)
क्रिती सेनॉन हिचा नुकताच “शेहजादा” नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला.बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा काही खास कमाल करू शकला नसल्याने हा चित्रपट जोरदार आपटला. क्रिती हिच्या करियर मधला हा सर्वात अयशस्वी सिनेमा आहे असं म्हणायला हरकत नाही.

नक्की काय आहे प्रकरण(Shreyas Talpade kriti sanon)
दरम्यान श्रेयस आणि क्रितीचा ट्विटर वर एक स्क्रीन शॉर्ट वायरल होत आहे. यात श्रेयस म्हणतोय मी आत्ताच “शेहजादा” सिनेमा पहिला कार्तिक आर्यननं यात खूप चांगलं काम केलं आहे. तर क्रिती सेनॉन ही तर देशाची पुढची मधुबाला आहे. हे ट्वीट पाहून क्रिती ला चांगलं वाटलं आणि तिनं या ट्विटला उत्तर दिलं. ‘वॉव मधुबाला यांची जागा तर नाही घेऊ शकत. परंतु इतकी प्रेमळ प्रतिक्रिया पाहून भारावून गेले आहे. धन्यवाद.’ या पोस्टबरोबर तिनं अनेक इमोजीही पोस्ट केले आहेत. हे ट्विट श्रेयस च्या वेरिफाइड अकाउंट वरून केलं असल्याने क्रितीला हे ट्विट श्रेयसनेच केलं असावं असं वाटलं. परंतु हे अभिनेत्री क्रितीच्या लक्षात आलं नसल्याने. काही युजरनं म्हटलं की, हे अभिनेत्याच्या नावानं उघडलेलं खोटं अकाऊंट असल्याचं स्पष्ट कळतं आहे. परंतु अभिनेत्रीची तुलना मधुबालाशी केल्यानं ती भारावून गेली आणि कोणताही विचार न करता तिनं या ट्वीटला उत्तर दिलयं.(Shreyas Talpade kriti sanon)
====
हे देखील वाचा – गणेश आचार्य यांच्या तालावर अभिनेते सयाजी शिंदे धरणार ठेका
====
या नंतर श्रेयसने त्याच्या अधीकृत ट्विटर अकाउंट वरून म्हंटल आहे की प्रिय कीर्ती तुला जो मेसेज मिळाला तो एका फेक अकाउंट वरून मिळाला आहे ते ट्विट मी केलं नाही तुला झालेल्या त्रासाबद्दल मी तुझी माफी मागतो. आणि तिला प्रेम तसेच शेहजादा साठी शुभेच्छा दिल्या आहेत. हे ट्विटर करताना श्रेयस ने वेरिफाईड आणि ट्विटर सपोर्टलाही टॅग केलं आहे श्रेयसला सपोर्ट करत त्याच्या चाहत्यांनी ट्विटरवरील हे फेक अकाउंट लवकरात लवकर डिलिट करावं अशी मागणी केली आहे.