महाराष्ट्राच्या मातीत कला आणि राजकारण याचं एक वेगळं समीकरण पाहायला मिळत आहे. पेशाने जरी राजकारणी तरी अभिनय क्षेत्रात सुद्दा अग्रेसर असणारे काही कलाकार दोन्ही गोष्टी अगदी लीलया पेलतात. यातलं एक नाव म्हणजे अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे. अमोल कोल्हे सध्या शिवपुत्र संभाजी या त्यांच्या महानाट्या मध्ये सर्वत्र व्यस्त आहेत. प्रेक्षकांचाही या नाट्याला भरभरून प्रतिसाद मिळतं आहे. तरीही या सर्वांमधून त्यांनी समाज प्रबोधनाचा त्यांचा वसा सोडला नाही.(amol kolhe)
अमोल कोल्हेंची शिवजयंती निम्मित एक पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. एक व्हिडिओ पोस्ट करत अमोल कोल्हेनी शिवजयंती दिवशी शिवनेरी किल्ल्यावर होणाऱ्या शासकीय कार्यक्रमावर मी बहिष्कार टाकत आहे असं ते या व्हिडिओ मधून म्हणाले आहेत. शिवनेरीवर भगवा ध्वज कायम फडकत राहावा अशी ही त्यांची मागणी आहे ती पूर्ण होईपर्यंत हा लढा असाच चालू राहील असं त्यांचं म्हणणं आहे.

२०२१ पासून मी करत असलेल्या या मागणीला हवा तास प्रतिसाद न आल्यामुळे खासदार म्हणून मी या कार्यक्रमाचा निषेध करत आहे असं अमोल कोल्हे यांनी सांगितलं. गृहमंत्र्यांना भेटून, संसदेत हा प्रश्न मांडून देखील यावर कोणतीच उपायोजना झाली नाही याबाबती अमोल कोल्हे यांनी खंत व्यक्त केली आहे.
====
हे देखील वाचा- ‘सह्याद्रीत येणाऱ्या दुर्गप्रेमींसाठी राहत घर खुलं’ अभिनेते अजय पुरकर यांचा निर्णय
====
अमोल कोल्हे यांच्या या मागणीला अनेक चाहत्यांनी तसेच अनेक कलाकारांनीही पाठिंबा दर्शवला आहे. स्वराज्यरक्षक संभाजी ,मालिकेतील बहिर्जी नाईक यांची भूमिका साकारणाऱ्या अजय तपकिरे यांनी सुद्दा पोस्ट कर आम्ही डॉक्टर साहेब तुमच्या सोबत आहोत असं कॅप्शन देत पाठिंबा दर्शवला आहे.(amol kolhe)

अमोल कोल्हेंच इतिहासाप्रति छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रति असणारी आस्था, प्रेम हे जग जाहीर आहे त्यांच्या अभिनयातून, लेखणीतून त्यांनी वारंवार या गोष्टीची अनुभूती करून दिली आहे. तर काही महिन्यांपूर्वी त्यांच्या शिवप्रताप गरुडझेप या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावल. तर याच चित्रपटाचा पुढचा भाग शिवप्रताप स्वारी आग्रा हा देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला आयेणार आहे याबाबतची माहिती त्यांनी दिली.