व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. या सुंदर दिवशी, लोक त्यांच्या आवडत्या व्यक्तीला फुले आणि भेटवस्तू देतात आणि त्यांचे नाते साजरे करतात. जगभरातील प्रेमी युगुलांसाठी व्हॅलेंटाईन डे हा नेहमीच खास दिवस असतो. आणि आज व्हॅलेंटाईन म्हणजेच प्रेमाचा दिवस आहे.यानिमित्ताने महाराष्ट्राची प्रसिद्ध अभिनेत्री हेमांगी कवी हिने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.(hemangi kavi’s lovestory)

हेमांगी कवी हिने खास तिच्या नवऱ्यासाठी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या engagement रिंग ची स्टोरी शेअर केली आहे. तिच्या नवऱ्याने तिला पिझ्झा हट मध्ये पहिल्यांदा प्रपोज केलं, यावेळी हेमांगीने पहिल्यांदाच पिझ्झा खाल्ला. प्रपोज करताना त्याने तिला एक रिंग घातली आणि तीच रिंग हेमांगीने तिच्या साखरपुड्याला घातल्याचे तिने यात सांगितले आहे.साखरपुड्यासाठी दुसऱ्या रिंगची मागणी नकेल्याने “अशी समजूतदार बायको मिळायला भाग्यच लागतं हो” अशा मिश्किल अंदाजात तिने नवऱ्याला टोमणा मारला आहे. “आम्ही एकमेकांना उगाचच काहीही gift करत नाही कामाच्याच गोष्टी gift करतो. दिवस ही साजरा होतो. गरज ही भागते आणि आठवण ही राहते!
====
हे देखील वाचा- पंढरीच्या विठुराया चरणी तल्लीन होणार ‘देवबाभळी दिंडी–धावा जनामनाचा…
====
आजही आम्ही असच काहीतरी खरेदी करणार आहोत. तुम्हीही करा” असा सल्ला देत यावेळी हेमांगीने चाहत्यांना व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी छान कमेंट करत तिने लिहिलेल्या पोस्टचे चाहते कौतूक करत आहेत.(hemangi kavi’s lovestory)