शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“पंखा साफ करायची वेळ…”, नेटकऱ्याच्या कमेंटवर सिद्धार्थ चांदेकरने दिलं तोडीस तोड उत्तर, म्हणाला, “कधी…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 11, 2023 | 10:59 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Siddharth Chandekar Troll

“पंखा साफ करायची वेळ…”, नेटकऱ्याच्या कमेंटवर सिद्धार्थ चांदेकरने दिलं तोडीस तोड उत्तर, म्हणाला, "कधी…"

सिनेसृष्टीत सध्या ‘झिम्मा २’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटातील ‘मराठी पोरी दुनियेला दाखवती माज’ या गाण्याने तर सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अनेक रसिक प्रेक्षक या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. अशातच या चित्रपटातील मुख्य अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि त्याच्या पत्नीला म्हणजेच मिताली मयेकरला ही या गणयावर थिरकण्याचा मोह आवरला नाही. सिद्धार्थने काल इंस्टाग्राम अकाऊंटवरून स्टोरी पोस्ट करत या गाण्यावर धमाल करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला होता. (Siddharth Chandekar Troll)

“मराठी पोरी…” हे ‘झिम्मा २’ चित्रपटातील पहिलं गाणं असून या गाण्याने अल्पावधीतच प्रेक्षकांना थिरकायला भाग पाडलं. या गाण्यामध्ये चित्रपटातील इंदू डार्लिंगच्या ७५ व्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन पाहायला मिळालं. या गाण्यातून स्त्रीत्वाचे अनेक पदर उलगडताना दिसले. स्त्रियांवर चित्रित करण्यात आलेलं हे गाणं प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतंय. या गाण्यावर नेटकरी, तसेच सिनेविश्वातील अनेक कलाकार रिल्स बनवत आहेत.

आणखी वाचा – चुकीच्या पद्धतीने मला हात लावला अन्…; सुरभी भावेने सांगितला मन सुन्न करणारा अनुभव, म्हणाली, “तो रोज येऊन…”

सिद्धार्थ-मितालीने या गाण्यावर केलेला डान्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. कमी वेळात हे गाणं भरपूर्ण लोकांनी पाहिलं आणि त्यांच्या व्हिडिओवर लाईक्सचा वर्षाव झाला. तसेच त्यांचा हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊसही पाडला. या जोडप्याने राहत्या घरी हा डान्स व्हिडीओ शूट केल्यामुळे सिद्धार्थ-मितालीच्या घराची झलक या व्हिडीओमध्ये नेटकऱ्यांना पाहायला मिळाली. दरम्यान दिवाळीनिमत्त सिद्धार्थ मितालीने घरामध्ये लायटिंग केली होती. विद्युत रोषणाईत त्यांचं घर उजळून निघालं होतं. त्यांचा हा व्हिडीओ पाहून एका युजरने कौतुक न करता त्यांच्या घरातील ‘पंखा स्वच्छ नाहीये’, अशी कमेंट करत त्यांना टोकलं.

View this post on Instagram

A post shared by Siddharth Seema Chandekar (@sidchandekar)

आणखी वाचा – काजोलने लेकीला दिला तिचा दृष्टिकोन बदलण्याचा सल्ला, न्यासाच्या या उत्तराने अभिनेत्री अवाक्, म्हणाली, “माझ्या तक्रारीसाठी…”

“पंखा साफ करायची वेळ आलीये” अशी कमेंट करत या नेटकऱ्याने सिद्धार्थ-मितालीची खिल्ली उडवली. परंतु, अभिनेत्याने या कमेंटकडे दुर्लक्ष न करता “कधी येताय?” असा खोचक प्रश्न विचारत नेटकऱ्याच्या प्रश्नाला रोखठोक प्रतिउत्तर दिलं. सिद्धार्थच्या कमेंटवर त्याच्या चाहत्यांनी “भारी उत्तर दिलंस” अशी प्रतिक्रिया दिली. तर नेटकऱ्याने सिद्धार्थच्या उत्तरावर पुन्हा कमेंट करत, “सिद्धू, हा विनोदी भाग होता. मला पंखे साफ करता आले असते तर माझ्या घरचे पंखेही असेच दिसले नसते. ”झिम्मा २’ चित्रपटाची वाट बघतोय”. अशी कमेंट केली आहे. यावरून सिद्धार्थच्या एका चाहत्यानेच ही मस्करी केलेली कळतेय.

Tags: entertainmentjhimma 2siddharth chandekarsiddharth chandekar troll
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Surabhi Bhave Emotional

मुलीला १०३ ताप असूनही मालिकेच्या शूटसाठी थांबवून ठेवलं अन्…; मराठी अभिनेत्री सुरभी भावेचा धक्कादायक खुलाासा, म्हणाली, "कोणाची गुलाम…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.