अनेक कलाकार अभिनया व्यतिरिक्त त्यांच्या वक्तव्यांसाठी, मतांसाठी प्रसिद्ध असतात. अशा अभिनेत्यांमध्येच एक नाव विशेषतेन घेतलं जात ते म्हणजे अभिनेते मिलिंद गवळी. स्टार प्रवाह वरील आई कुठे काय करते या मालिकेतील त्यांच्या कामामुळे प्रेक्षकांची त्यांना चांगलीच पसंती मिळत आहे. नकारात्मक भूमिका असुनही प्रेक्षकांची वाहवा मिळवणं कोणालाही सहज शक्य होतं नाही. परंतु मिलिंद गवळी यांच्या बाबती ही गोष्ट अपवाद ठरते. आई कुठे काय करते या मालिकेत मिलिंद यांनी साकारलेली अनिरुद्धची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावलेली दिसते. अरुंधतीला त्रास दिल्यामुळे काहींना अनिरुद्ध म्हणून ते आवडतही नाहीत पण मिलिंद म्हणून त्यांच्यावर प्रेम करणारे ही कमी नाहीत.(milind gawali)
अभिनेते मिलिंद गवळी सोशल मिडिया वर नेहमी सक्रिय असतात. नुकतीच त्यांनी इन्स्टाग्राम अकॉउंट वरून एक पोस्ट केली आहे ज्यात त्यांनी लहानपणीचा एक महत्त्वाचा किस्सा सांगितला आहे. मिलिंदने त्यांच्या लहापणी घरी येणाऱ्या मंडळींपैकी एक राजकारणी राजकारणी आमच्या घरी यायचे त्यांच्या चेर्याव्र मला प्रचंड माज दिसायचा आणि शाळेत जाताना त्यांना अनेक गुंड, दिसायचे. या संदर्भात संदर्भात त्यांनी ही खाली दिलेली पोस्ट लिहिली आहे.

““मै चला अकेला, रास्तों पे”
मेरे पीछे कोई भी नहीं है, मेरे जो है सपने वही तो है अपने,
आपण जेव्हा शाळेत असतो त्या वेळेला आपण मोठं व्हायची स्वप्न बघत असतो , मोठा झाल्यानंतर आपल्याला काय व्हायचं हे ? ठरवत असतो . लोकांकडे बघतो , त्यांचं आयुष्य बघतो आणि आपल्याला असं वाटतं आपण यांचे सारखं व्हावं, मी लहानपणी बघितलेली माणसं, त्या माणसांन मद्धे, मला बहुतेक सगळीच माणसं आवडायची , फक्त आमच्या घरी एक पॉलिटिशन politician यायचे, ते आमचे नातेवाईक होते, ते आले की घरा मधलं वातावरणच बदलून जायचं , सगळ्यांनची धावपळ, सगळे आपलं काम सोडून त्यांची वाट बघत बसायचे, ते आले की त्यांना खूप भाव मिळायचा, पण त्यांना भेटलं की मला एक खूप माज असलेला अहंकारी माणूस त्यांच्यामध्ये दिसायचा, तेव्हाच मी ठरवलं होतं की आयुष्यामध्ये कधीही असं पॉलिटिशन politician व्हायचं नाही.(milind gawali)
वडील पोलीस खात्यात असल्यामुळे असंख्य पोलीस officers यायचे, बरेचसे चांगले प्रेमळ असायचे पण काहींमध्ये परत तोच माज असायचा, मग आपण पोलीस ऑफिसर झालो तर वडिलांसारखा चांगला ऑफिसर व्हायचं असं मनामध्ये ठरवलं, पण माझं डोकं तापट होतं, त्यामुळे आपल्याला चांगला प्रेमळ वगैरे होता येणार नाही , आपण खूप हाणामाऱ्याच करू , जर आपण पोलीस झालो तर , याची मला खात्री होती. पोलीस स्टेशनच्या वरती राहायचो आम्ही, त्यामुळे शाळेमध्ये जाताना येताना खाली बऱ्याचशा आरोपींची सुद्धा ओळख व्हायची माझी, अंडरवर्ल्ड चे लोकं असायचे ते , पण त्यांच्याकडे बघून मला , आपण कधीच अंडरवर्ल्ड मध्ये जायचं नाही , असंच मनाने ठरवून टाकलं होतं.
सिनेमे बघायला जायचो कधी कधी, त्यामुळे पडद्यावरचे विश्व फारच वेगळं आणि भन्नाट वाटायचं, त्या विश्वात जर आपल्याला जायला मिळालं तर किती मजा येईल,पण तिकडे कसं जातात हे काहीच माहिती नव्हता, हिरोज पडद्यावर करतात ते सगळे आपल्याला यायला हवं, अमिताभ बच्चन ने मुकद्दर का सिकंदर मध्ये हात सोडून मोटरसायकल चालवलतो मग तशी हात सोडून मोटर सायकल चालवायला शिकलो , मेरा गाव मेरा देश मध्ये विनोद खन्ना घोडा चालवतो , मग घोडा चालवायला पण शिकलो, पोहायला शिकलो, आपल्याला जे जे सुचेल ते ते सगळ करायची तयारी होती, पण त्या पडद्यावर जायचं. पुढे सगळा अंधारच होता, पण आपण त्या रस्त्यावर चालायचं, मार्ग शोधून काढायचा, दहावीत असताना एकदा शूटिंग बघायला गेलो, आणि छोटासा प्रकाश दिसला, “हम बच्चे हिंदुस्तान के” नावाचा चित्रपट होता , तो माझा पहिला चित्रपट, ते डायरेक्टर्स कट प्रोडक्शन चं“आई कुठे काय करते
प्रवास चालूच आहे, मार्ग काढत, चाचपडत धडपडत,
अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे”.(milind gawali)
अनिरुद्ध यांनी अजून बरंच लांब जायचं आहे असं म्हणत पुढे त्यांच्या नवीन भूमिका पाहायला मिळणार का असे संकेत प्रेक्षकांना दिले आहेत.