मंगळवार, जून 3, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“महाराष्ट्रात घडणारा हिंदी चित्रपट हवा”, सुप्रसिद्ध मराठी चित्रपटाच्या लेखकाची पोस्ट चर्चेत, म्हणाला, “मराठी माणंस, संस्कृती…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑक्टोबर 20, 2023 | 5:44 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Kshitij Patwardhan post for 'Sajini Shinde ka Viral Video' director

"महाराष्ट्रात घडणारा हिंदी चित्रपट हवा", सुप्रसिद्ध मराठी चित्रपटाच्या लेखकाची पोस्ट चर्चेत, म्हणाला, "मराठी माणंस, संस्कृती..."

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट लेखक व गीतकार क्षितिज पटवर्धन सध्या बरेच चर्चेत आले आहे. क्षितिज यांनी ‘धुराळा’, ‘टाईमपास’, ‘फास्टर फेणे’ यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांच्या कथा, पटकथा, संवाद लिहिले आहेत. त्याचबरोबर, रवी जाधव दिग्दर्शित ‘ताली’ या वेब सीरिजचे लेखन देखील त्यांनी केलेले आहे. सध्या त्यांची पटकथा आणि संवाद असलेला ‘सजनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. यानिमित्ताने त्यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक मिखिल मुसळे यांच्यासाठी खास पोस्ट केली आहे. (Kshitij Patwardhan post for ‘Sajini Shinde ka Viral Video’ director)

क्षितिजने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे. ज्यात त्यांनी दिग्दर्शक मिखिल मुसळेचा फोटो शेअर केला. या फोटोमध्ये मिखिल एका झाडाखाली बसलेले दिसतात. त्यांनी या फोटोला “मला महाराष्ट्रात घडणारा हिंदी चित्रपट करायचा आहे.”, असं कॅप्शन देत सर्वांचं लक्ष वेधलं आहे. या पोस्टमध्ये ते म्हणाले, “मिखिल मुसळे या मराठी नावाच्या पण गुजरातमध्ये वाढलेल्या दिग्दर्शकाने दोन वर्षापूर्वी जेव्हा सांगितलं. तेव्हा मी म्हणालो “का?” त्याने ठामपणे सांगितलं की, “मराठी माणसं, संस्कृती आणि समाज हा माझ्या जगण्याचा भाग आहे, म्हणून तो माझ्या चित्रपटाचा ही भाग असला पाहिजे!” मला कौतुक वाटलं आणि मी लेखन प्रक्रियेत सहभागी झालो.”

“दोन-अडीच वर्ष रायटर्स रूममध्ये जीव तोडून काम, मॅडॉक फिल्म्ससारख्या निर्मिती संस्थेत आणि पर्यायाने हिंदी सिनेसृष्टीत मिळालेला प्रवेश, जवळपास ३०-३१ वेळा हिंदीमध्ये वाचन, विविध नावाजलेल्या कलाकारांशी झालेल्या भेटीगाठी आणि आयुष्यभरासाठी जोडलेले माझे मित्र! सजनी शिंदेने मला खूप काही दिलं, पण सगळ्यात महत्वाचं दिलं ते आत्मविश्वास, भाषेच्या पलीकडे जाऊन लिखाणावर काम करण्याची ऊर्मी आणि न लाजता न बुजता स्वतःचं म्हणणं मांडण्याची शक्ती. माझ्यातील भाबडेपणा कमी करण्यास या चित्रपटाची फार मदत झाली.”, असं ते यात म्हणतात.

हे देखील वाचा – Bigg Boss 17 : ‘बिग बॉस’च्या घरात नील भट्ट व विकी जैन यांच्यात मारामारी, अंकिता लोखंडेच्या नवऱ्याला मारायला धावला अन्…

View this post on Instagram

A post shared by Kshitij Patwardhan (@kshitijpatwardhan)

“माझा याच दिग्दर्शक मित्रामुळे मॅडॉक फिल्म्समध्ये पुढचा हा चित्रपट मिळाला जो लवकरच येईल. त्यानेच माझं नाव सिंघम चित्रपटासाठी सुचवलं होतं. मिखिल, ही पोस्ट तुझ्या वेडेपणासाठी, चित्रपटावरच्या प्रेमासाठी, आणि लेखकांच्या मागे हक्काने उभं राहायचं या स्पिरीटसाठी!”, असं म्हणत त्यांनी दिग्दर्शक मिखिल मुसळे यांचे आभार मानले आहे. त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या चाहत्यांना ‘सजनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ’ चित्रपट पाहण्याचे आवाहनसुद्धा केले आहे.

हे देखील वाचा – कंगना रणौतच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन, बाळाला जवळ घेतल्यानंतर भावुक, म्हणाली, “मुलगा झाला आहे”

मराठमोळा दिग्दर्शक मिखिल मुसळे यांचा ‘सजनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. ज्यात राधिका मदन, निम्रत कौरसह सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर हे मराठमोळे कलाकारदेखील झळकणार आहेत. तर क्षितिज पटवर्धन यांच्याबद्दल बोलायला गेल्यास, त्यांनी अनेक मराठी व हिंदी चित्रपटांची गाणी लिहिली आहे. ज्यातील अनेक गाणी गाजलेली आहेत.

Tags: kshitij patwardhanKshitij Patwardhan post for 'Sajini Shinde ka Viral Video' directormikhil musaleSajini Shinde ka Viral Video
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

seema kapoor torchered by own mother
Entertainment

आईकडून मारहाण, टॉर्चर अन् हाल; सुप्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला वाईट काळ, जन्मदातीच वैरी ठरली तेव्हा…

जून 2, 2025 | 7:00 pm
Premachi Goshta fame Swarda Thigales car accident
Entertainment

‘प्रेमाची गोष्ट’मधील मुक्ताचा अपघात, गाडी चालवताना झोप लागली अन्…; अभिनेत्रीचं मोठं नुकसान

जून 2, 2025 | 5:58 pm
Vaishnavi Hagawane Death
Entertainment

वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं बाळ कोणाजवळच राहीना, आईविना लेकराचे रडून-रडून हाल, हृदयस्पर्शी व्हिडीओ समोर

जून 2, 2025 | 5:00 pm
Radhika Apte Motherhood
Entertainment

बाळ होण्याच्या एक दिवस आधीपर्यंत केलं काम, अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतील सत्य, म्हणाली, “इथं काम करणं…”

जून 2, 2025 | 3:30 pm
Next Post
Aamir Khan Leaving Mumbai

मुंबई सोडून जाणार आमिर खान, अभिनेत्याचा मोठा निर्णय, पण यामागचं नेमकं कारण काय?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.