बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अशातच उर्वशी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. उर्वशी रौतेला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी गेली होती. यादरम्यान तिच्याबरोबर घडलेल्या वाईट प्रसंगामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. भारत पाकिस्तान मॅच पाहण्यासाठी अनेक सिनेतारकांनी हजेरी लावली होती. यावेळी अभिनेत्री उर्वशी रौतेलानेही लाईव्ह मॅचचा आनंद लुटण्यासाठी अहमदाबाद येथील स्टेडियमला हजेरी लावली होती. (Urvashi Rautela iPhone Stolen)
यावेळी उर्वशीने तिच्याबरोबर घडलेल्या वाईट प्रसंगाचा अनुभव सोशल मीडियावरून शेअर केला आहे. काही चोरट्यांनी उर्वशी रौतेला हीच २४ कॅरेट सोन्याचा आयफोन चोरला असल्याची बातमी तिने सोशल मीडियावरून शेअर केली आहे. याबाबत उर्वशी रौतेलाने ट्विट केले आहे. या ट्विटद्वारे बॉलिवूड अभिनेत्रीने सामना पाहण्यासाठी गेलेल्या लोकांकडून मदतीचे आवाहन केले आहे. तिने आपल्या ट्विटमध्ये असेही म्हटले आहे की, तिचा आयफोन अस्सल २४ कॅरेट सोन्याने जडलेला आहे.
???? Lost my 24 carat real gold i phone at Narendra Modi Stadium, Ahmedabad! ????️ If anyone comes across it, please help. Contact me ASAP! ???? #LostPhone #AhmedabadStadium #HelpNeeded #indvspak@modistadium @ahmedabadpolice
— URVASHI RAUTELA???????? (@UrvashiRautela) October 15, 2023
Tag someone who can help
उर्वशी रौतेलाने आयफोन चोरीला जाण्याबाबत केलेल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की “नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये माझा २४ कॅरेट अस्सल सोन्याचा आयफोन हरवला आहे. कोणाला तो सापडला असेल तर कृपया मदत करा. लवकरात लवकर माझ्याशी संपर्क साधा. जो कोणी माझी मदत करू शकेल, त्याने मला टॅग करा”, असं ट्विट केलं आहे. उर्वशीच हे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय नेटकरीही सातत्याने कमेंट करून आपले मत व्यक्त करत आहेत. तर अनेकजण कमेंट्स करत तिची खिल्ली उडवताना दिसत आहेत. दरम्यान फोन हरवल्याप्रकरणी अनेक नेटकऱ्यांनी उर्वशी रौतेलाबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे.
भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने पाकिस्तानचा पराभव करून सलग तिसरा विजय नोंदवला. खरं तर, आतापर्यंत एकदिवसीय विश्वचषकात भारत व पाकिस्तान ८ वेळा आमनेसामने आले आहेत. अशातच पाकिस्तानला प्रत्येक वेळी टीम इंडियाकडून पराभवाला सामोरे जावे लागले आहे.