‘आई कुठे काय करते’ या मालिकेवर व मालिकेतील प्रत्येक पात्रावर अनेक प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. मालिकेच्या कथानकात अनेक टर्न अँड ट्विस्ट आलेले पाहायला मिळाले. त्यानंतर आता ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र नेहमीच खऱ्या आयुष्यात सोशल मीडियावरून काही ना काही शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. या मालिकेतील एक पात्र म्हणजे गौरी कुलकर्णी. गौरीने आजवर तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. गौरी सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते. (Gauri Kulkarni Engaged)
काल गौरीचा वाढदिवस होता, त्यानिमित्त अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त गौरीने साऱ्या चाहत्यांना आणखी एक गुडन्यूज दिली आहे. वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशीच गौरीने साऱ्यांना खुशखबर दिली आहे. गौरीने सोशल मीडियावरून एक पोस्ट शेअर केली आहे. यांत तिने चाहत्यांना रिंग फ्लॉन्ट करतानाचा फोटो शेअर करत गुडन्यूज दिली आहे. लवकरच गौरी विवाहबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे.
अभिनेत्रीने सोशल मीडियावरून रिंग फ्लॉन्ट करतानाचा फोटो शेअर केला असून त्याखाली ‘इट्स हॅपनिंग…’ असं कॅप्शन दिल आहे. यावरून ती लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. अद्याप गौरीने तिच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबरचे फोटो पोस्ट केले नाहीत. त्यामुळे गौरीचा जीवनसाथी नेमकं कोण असणार, याकडे साऱ्यांचा नजरा वळल्या आहेत.
गौरीने शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत. गौरीच्या या रिंग फ्लॉन्ट करतानाच्या फोटोंवर अनेकांनी कमेंट करत तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तर अनेकांनी तिच्या या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.