जागतिक अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या सासरी गेल्या काही दिवसांपासून सर्व काही विस्कळीत झालं आहे. प्रियांकाचा धीर जो जोनास व अभिनेत्री सोफी टर्नर यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. दोघेही लवकरच घटस्फोट घेणार असल्याच्या बातम्यांना उधाण आलं आहे. त्यानंतर आता या जोडप्याबाबत नवा वाद समोर आला आहे. (Jo Jonas On Sophie Turner)
‘पीपल’मधील वृत्तानुसार, सोफीने तिचा पती जोविरुद्ध गुन्हा दाखल केला असल्याचं समोर आलं आहे. सोफीने आरोप केला आहे की, “जोने मुलांचे पासपोर्ट आपल्याकडे ठेवले आहेत. जेणेकरून तो मुलांना त्याच्या जवळ ठेवू शकेल. त्याने मुलांचे इंग्लंडमध्ये परतणे थांबवले आहे. हे इंग्रजी कायद्या अंतर्गत आईच्या अधिकारांचे उल्लंघन आहे. इंग्लंड हे मुलांचे खरे घर आहे. अशा परिस्थितीत जोने त्यांचा पासपोर्ट सोपवावा आणि तिने आपल्या मुलींसह इंग्लंडला परत जावे”, अशी सोफीची इच्छा आहे.
आता जो जोनासने सोफीच्या या आरोपांवर मौन सोडले आहे. जो याबाबत म्हणाला की, “अपहरण असा शब्द जेव्हा वापरला जातो तेव्हा तो दिशाभूल करण्यासारखा होतो. वाईट काळात कायदेशीर व्यवस्थेचा गैरवापर होतो.” सूत्रांच्या हवाल्याने असे समोर आले आहे की, ‘दोघेही मुलांची जबाबदारी वाटून घेण्यास तयार आहेत. त्यांच्या मुलींचे पालनपोषण यूके व यूएस या दोन्ही देशांमध्ये व्हावे, अशी त्यांची इच्छा आहे. “जो व सोफी यांना दोन मुले आहेत. पहिल्या मुलीचे नाव विला असून ती तीन वर्षांची असून दुसरी मुलगी अवघ्या १४ महिन्यांची आहे”.
सूत्रांच्या माहितीनुसार असं समोर आलं आहे की, जोने फ्लोरिडामध्ये घटस्फोटाची तयारी देखील सुरू केली होती. तर सोफीला याबाबत आधीच माहिती होती की, तो घटस्फोटाची कारवाई करणार आहे. त्याचवेळी फ्लोरिडा न्यायालयाने मुलांच्या पालकांना आधीच आदेश दिले होते की, त्यांना मुलांसोबत कुठेही बाहेर जाण्याची परवानगी नाही. काही दिवसांपूर्वी सोफी व जो यांची भेट झाली होती, जिथे दोघांनी आपल्या मुलींना एकत्र वाढवण्याचा निर्णय घेतला होता. पण नंतर काही दिवसांनी सोफीने ठरवले की, तिला तिच्या मुलींसह यूकेमध्ये स्थायिक व्हायचे आहे. यामुळे त्यांनी जोविरुद्ध गुन्हा दाखल केला.