रविवार, मे 11, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“पटलं नाही तर…”, ‘बम्बई मेरी जान’ वेबसीरिजला मनसेचा इशारा, अमेय खोपकर म्हणाले, “मुंबई ऐवजी ‘बम्बई’ वापरण्याची…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
सप्टेंबर 14, 2023 | 7:33 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Amey Khopkar warns Bambai Meri Jaan Webseries

"पटलं नाही तर…", 'बम्बई मेरी जान' वेबसीरिजला मनसेचा इशारा, अमेय खोपकर म्हणाले, "मुंबई ऐवजी 'बम्बई' वापरण्याची…"

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरची निर्मिती असलेली ‘बम्बई मेरी जान’ ही वेबसीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे. मुंबई अंडरवर्ल्डबाबत ही वेबसीरिज आधारित असून या वेबसीरिजमध्ये अभिनेता के के मेनन व अविनाश तिवारी मुख्य भूमिकेत दिसत आहे. एकीकडे या वेबसीरिजची चर्चा सुरु असताना आता ही वेबसीरिज वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. कारण, या वेबसीरिजच्या नावावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात ही वेबसीरिज पाहून यावर योग्य निर्णय घेणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. (Amey Khopkar warns Bambai Meri Jaan Webseries)

अमेय खोपकर यांनी ‘बम्बई मेरी जान’ वेबसीरिजच्या नावासंदर्भात एक ट्विट केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी वेबसीरिजचे काही फोटोज शेअर केले आहे. तसेच ‘भारत’ आणि ‘इंडिया’ नावाच्या वादाचाही उल्लेख करताना त्यांनी एका प्रसिद्ध वृत्तपत्राचा उल्लेख केला आहे. या ट्विटमधून अमेय खोपकर यांनी आपण ही सीरिज पाहून निर्मात्यांना वेबसीरिजच्या नावावर योग्य निर्णय न घेतल्यास ‘खळ्ळ खटॅक्क’चा इशारा दिला आहे.

अमेय खोपकर या ट्विटमध्ये म्हणाले, “‘नावात काय आहे?’ असे शेक्सपियर म्हणून गेला. परंतु, जे दिल्लीत आणि जे मुंबईत चालू आहे ते पाहता ‘नावा‘तच सर्व काही आहे असे वाटते! फायदा कोणत्याही राजकीय पक्षाचा असो.. परंतु, इंग्रजांना हुसकावून लावून ७५ वर्षे झाली तरी जगाने आजही आपल्याला त्यांनीच दिलेल्या ‘इंडिया’ ह्या नावाने ओळखावे ही गोष्ट बरी नाही. पण मग.. ‘भारत’ नाव बदलासाठी आग्रही असणारे लोक ‘मुंबई’च्या नामबदला संदर्भात इतके उदासीन कसे?”

हे देखील वाचा – “सुशिक्षित आहेस ना?”, नो एन्ट्रीमधून जाणाऱ्यावर भडकला जितेंद्र जोशी, म्हणाला, “तू वागतो ते…”

"नावात काय आहे?" असे शेक्सपियर म्हणून गेला.. परंतु, जे दिल्लीत आणि जे मुंबईत चालू आहे ते पाहता ‘नावा‘तच सर्व काही आहे असे वाटते!
फायदा कोणत्याही राजकीय पक्षाचा असो.. परंतु, इंग्रजांना हुसकावून लावून ७५ वर्षे झाली तरी जगाने आजही आपल्याला त्यांनीच दिलेल्या India ह्या नावाने ओळखावे… pic.twitter.com/sD5bD3mauW

— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) September 14, 2023

पुढे ते म्हणाले, “जर ‘क्रिएटिव्हिटीच्या’ नावाखाली कितीही गरज पडत असेल, तरी आपल्या शहराच्या जुन्या नावाचे फलक गावभर लावणे आणि टाईम्स ऑफ इंडिया सारख्या नामांकित जबाबदार वृत्तपत्राने आपली ओळख बदलून काही पैशांसाठी लाचारीने हे जुने नाव मिरवणे, हे सुद्धा अजिबात बरे नाही! अहो ‘बॉम्बे‘ आणि ‘बम्बई‘चे ‘मुंबई‘ करण्यासाठी कित्येक लोकांनी किती परिश्रम केले. हे आपण विसरलो का? राजकीय दस्तावेजांमधून अधिकृतरित्या जरी जुने नाव हद्दपार झाले असले, तरीही अमराठी लोकांच्या वाणीवरून आणि मनावरून हे नाव पुसून टाकण्याचा लढा आजही चालू आहे.”

हे देखील वाचा – “गणपतीच्या मंडपात पत्त्यांचे डाव अन्…”, मिलिंद गवळींचं सार्वजनिक गणेशोत्सवाबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले, “मुलं दारू पिऊन…”

असो.. अजून मी ही वेबसीरिज पाहिलेली नाही. पण बघतोच! आणि मुंबई ऐवजी ‘बम्बई’ वापरण्याची इतकी काय क्रिएटिव्ह गरज होती हेही बघतो.. पटलं तर ठीक आहे.. अन्यथा खळ्ळ खटॅक्क!!”, असं म्हणत अमेय खोपकर यांनी निर्मात्यांना इशारा दिला आहे.

Tags: amazon prime videoamey khopkarbambai meri jaanott release
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Kitchen Hacks
Lifestyle

Kitchen Tips : जेवण बनवताना खूपच तारांबळ होते?, मधुराच्या ‘या’ सोप्या टिप्स ठरतील फायदेशीर

मे 11, 2025 | 5:00 pm
Marathi actor chetan dalvi journey
Entertainment

ब्रेनस्ट्रोक, इंडस्ट्रीला विसर अन्…; मराठी सुप्रसिद्ध अभिनेत्याचा सगळ्यात वाईट काळ, आता दिसतात असे

मे 11, 2025 | 1:00 pm
Mumbai Shocking News
Women

अश्लील व्हिडीओ दाखवून आठ वर्षाच्या मुलीचे कपडे काढणारा ‘तो’ जिवंत राक्षस

मे 11, 2025 | 10:00 am
Hina Khan Received Threats
Entertainment

धर्म, पाकिस्तान अन् त्रास; मुस्लिम म्हणून हिना खानला थेट धमक्या, म्हणाली, “सीमेपलीकडील लोकांवरही प्रेम केलं पण…”

मे 10, 2025 | 6:17 pm
Next Post
Home Minister Show completes 19 Years

'होम मिनिस्टर'ला १९ वर्ष पूर्ण, आदेश बांदेकरांनी मानले प्रेक्षकांचे आभार, म्हणाले, "मागे वळून बघताना…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.